Pappu Yadav death threats बिहारचे पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने व्हॉट्सॲप ऑडिओ कॉलद्वारे ही धमकी दिली आहे. खासदार पप्पू यादव यांना मिळालेल्या धमकीचा ऑडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा : 'हे' राज्य ठरवणार अमेरिकेचे भवितव्य !
व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ पप्पू यादवला वारंवार आपला भाऊ म्हणत आहे. तसेच त्याच्या कामाचे कौतुक केले. Pappu Yadav death threats व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असेही म्हणतो की, 10 मिनिटे तुरुंगाची खोली बंद केल्यानंतर त्याने फोन का उचलला नाही? अखेर या व्हायरल ऑडिओमध्ये लॉरेन्सच्या भावाने पप्पू यादवला 3 तासांचा अल्टिमेटम दिला असून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.