जाणून घ्या अभिजात भाषा म्हणजे काय?

    दिनांक :03-Oct-2024
Total Views |
नवी दिल्ली,
Marathi Language गेली किमान १० ते १२ वर्षं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी लढा सुरु होता. अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. मराठी सोबत पाली, बंगाली, असामी आणि प्रकृतला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. अनेक वर्षांपासूनची मराठी माणसाची मागणी केंद्रीय कॅबिनेट ने पूर्ण केली. विरोधी पक्षांच्या खासदारांनी देखील केंद्र सरकारच्या अधिवेशनामध्ये याची मागणी केली होती. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक आज (दि. 3) चर्चा झाली.या बैठकीत निर्णय घेण्यात आलाय. यावर नेत्यानंनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
 

marathi bhasha  
 
 
पण तुम्हाला माहिती आहे का Marathi Language अभिजात भाषा म्हणजे काय ? तो दर्जा कसा मिळतो आणि तो मिळाल्याने काय फायदा होतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.

अभिजात भाषा म्हणजे काय ?
अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. हा दर्जा केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष ठरवल्याप्रमाणे दिला जातो.
अभिजात भाषा ठरवण्याचे निकष कोणते ?
कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत. गृह मंत्रालयाने 2005 साली हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिले. त्याचे काय निकष आहेत बघुयात.
•भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा असावा. म्हणजे २०००-३००० वर्षे जुने असावे.
•प्राचीन साहित्य हवं, जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटतं.
•दुसर्‍या भाषासमूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी.
•'अभिजात' भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी.
भारतात या आधी 6 भाषांना अभिजात दर्जा दिलेला आहे. तामिळ (2004), संस्कृत (2005), कन्नड (2008), तेलुगु (2008), मल्याळम (2013) आणि ओडिया (2014).
अभिजात दर्जाने काय लाभ होतात ?
याबद्दल 2016 साली सांस्कृतिक मंत्रालयाने सांगितलं होतं की संस्कृत, तामिळ, कन्नड, तेलुगु या भाषांसाठी काही संस्था उभारल्या गेल्या आहेत. तसंच या भाषांमधल्या प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी आर्थिक तरतूदही केली गेली होती. यात प्रत्येक भाषेसाठी दरवर्षी काही कोटी रुपये दिले गेले होते.
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा Marathi Language विभागाने आपल्या वेबसाईटवर अभिजात दर्जा मिळण्याचे भाषा संवर्धनासाठी काय फायदे सांगितले आहेत
•मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणं
•भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणं
•प्राचीन ग्रंथ अनुवादित करणं
•महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालयांना सशक्त करणं
•मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणं
या सगळ्या गोष्टींचा लाभ आपल्या भाषेला दिला जातो.