नागपूर,
Somalwar School Maa-Umiya Branch सोमलवार शाळा माँ-उमियाँ शाखेनी साजरा केलेली आंतर शालेय सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी गोडी, आपुलकी निर्माण व्हावी त्यांचे भाषाविषयी ज्ञान वाढावे या साठी राज्य सरकार ने योजिलेल्या या उद्देशाला लक्षात ठेऊन सोमलवार शाळा माँ उमियाँ CBSE शाखा कापसी येथे "सोहळा मराठी परंपरेचा २०२४ " अंतर्गत विविध आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.या द्विदिवसीय कार्यक्रमात विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला.या कार्यक्रमाला निर्णायक म्हणून डाँ. सुनंदा बोरकर जुलमे, रश्मी वानखडे, डाँ. वैजयंती पेशवे व डाँ. प्रांजली मोरस्कर लाभल्या.
साभिनय गीत स्पर्धा (वर्ग के.जी. १ ,के.जी.२ व १ ली) कथाकथन स्पर्धा (वर्ग २री व ३री) एकपात्री अभिनय स्पर्धा (वर्ग ४थी ,५वी ) व भारूड स्पर्धा (वर्ग ६वी ते ८वी) च्या विद्यार्थ्यासाठी आयोजित करण्यात आली.Somalwar School Maa-Umiya Branchसाभिनय गीत स्पर्धेत प्रथम क्रमांक व्हि. एल. सोनी हायस्कूल,द्वितीय क्रमांक सोमलवार शाळा माँ उमिया शाखा, कपसी तृतीय क्रमांक क्रिश कान्हेंट बारद्वारी, कापसी वउत्तेजनार्थ पारितोषिक न्यू इंग्लिश हायस्कूल, काँग्रेस नगर यांना प्राप्त झाले.
कथाकथन स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीजा गीत मोने ,( भवन्स विद्या मंदिर, कोराडी)द्वितीय क्रमांक - वरद भुसारी (सोमलवार शाळा रामदास पेठ) व Somalwar School Maa-Umiya Branchतृतीय क्रमांक - रूतिका भुसारी(सोमलवार शाळा रामदास पेठ) व उत्तेजनार्थ पारितोषिक भार्गवी नरड(सोमलवार शाळा माँ उमियाँ शाखा, कापसी )यांना प्राप्त झाले.एकपात्री स्पर्धत प्रथम क्रमांक - सान्वी काशीकर (सोमलवार शाळा माँ उमियाँ शाखा) द्वितीय क्रमांक - केतकी काळे ( भगवती हायस्कूल) तृतीय क्रमांक - राघव जोशी (सोमलवार शाळा निकालस)पहिले उत्तेजनार्थ पारितोषिक पिहू गोजे(भवन्स कोराडी )व द्वितीय उत्तेजनार्थ पारितोषिक- शौर्य सावरकर (व्ही.एल. सोनी )यांना प्राप्त झाले. भारूड स्पर्धा ( यामध्ये विद्यार्थ्यांना स्वतः गायचे होते.) प्रथम क्रमांक - सोमलवार शाळा माँ उमियाँ शाखा पारडीद्वितीय क्रमांक - स्कूल ऑफ स्कॉलर्स अत्रे ले आऊट ,तृतीय क्रमांक - सोमलवार शाळा निकालस शाखातसेच वी.एल. सोनी या शाळेला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले.
या सर्व बालकलाकारांचा कौतुक सोहळा बघण्यासाठी सोमलवार शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आर. पी. सोमलवार, सचिव पी.पी. सोमलवार,Somalwar School Maa-Umiya Branch सदस्या सुप्रिया कोलवाडकर, कार्यकारी सदस्य वेंकटेश सोमलवार खामला शाखेचे मुख्याध्यापक . ए.डी. पांडे व सोमलवार माँ उमियाँ शाखेच्या मुख्याध्यापिका राजश्री दत्ता उपस्थित होते.मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना सरिता कोकर्डेकर, साधना गोंड, सविता मिश्रा, प्रवीण देशपांडे , भूषण पाठक व नीरज टेकाम यांचे मार्गदर्शन लाभले.
सौजन्य: सरिता कोकर्डेकर, संपर्क मित्र