विदर्भपुत्रांचा मुख्यमंत्री पदाचा तिसरा डाव: 'शकुंतले'ला पुनरुज्जीवन मिळणार का?

    दिनांक :11-Dec-2024
Total Views |
यवतमाळ,
Shakuntala Railway Broad Gauge Project पश्चिम विदर्भाच्या विकासासाठी अत्यावश्यक असलेला शकुंतला रेल्वेमार्ग ब्रॉडगेज प्रकल्प (यवतमाळ-मूर्तिजापूर-अचलपूर) दशकानुदशकं प्रलंबित आहे. नागपूरमध्ये येणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी विदर्भातील जनतेने केली आहे. विदर्भपुत्रांच्या हातात सत्ता आहे, आता नाही तर कधी? असा सवाल शकुंतला रेल्वे विकास समितीने उपस्थित केला आहे. उच्च प्रतीचा कापूस उत्पादन करणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातून जाणाऱ्या आणि १२० वर्षांचा इतिहास असलेल्या शकुंतला रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर विदर्भातील आर्थिक प्रगतीला चालना देऊ शकते. २०१७ मध्ये फडणवीस आणि सुरेश प्रभू यांनी जाहीर केलेल्या 'कॅपिटल इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम' अंतर्गत राज्य सरकारने ५०% आर्थिक सहभागाची तयारी दर्शवली होती. मात्र प्रत्यक्ष प्रकल्प अद्याप सुरू होऊ शकलेला नाही. नागपूर अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित होणार की नाही, हे बघणे महत्त्वाचे ठरेल. हेही वाचा : मोठी बातमी ! ट्रायचा मेसेज ट्रेसिबिलिटी नियम आजपासून लागू
 
 
Shakuntala Railway
 
 
नागपूर अधिवेशन म्हणजे विदर्भाच्या समस्या सोडवण्याचे व्यासपीठ मानले जाते. पण याआधीच्या अधिवेशनांमध्ये शेती, उद्योग, वीज प्रकल्प, रोजगार अशा महत्त्वाच्या विषयांवर भाषणांचा गाजावाजा होऊनही निर्णय काहीच निघाले नाहीत. यंदा शकुंतला रेल्वेमार्गासारख्या महत्वाच्या प्रकल्पासाठी चर्चा होईल का, की अधिवेशन फक्त आश्वासनांचा मेळावा ठरेल? Shakuntala Railway Broad Gauge Project विदर्भातील दिग्गज नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पासाठी ठोस प्रयत्न करण्याची गरज आहे. शकुंतला रेल्वेमार्ग प्रलंबित राहिल्यास विरोधकांना चांगलीच कुरघोडी करण्याची संधी मिळेल. वर्धा-नांदेड रेल्वेमार्गाला जोडून शकुंतला रेल्वेमार्ग यवतमाळ-मूर्तिजापूर-अचलपूरचा विस्तार झाल्यास धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल. श्री रेणुकादेवी, श्री दत्त शिखर (माहूर), श्री चिंतामणी (कळंब), श्री एकविरा देवी (हिवरा संगम), श्री गुरू मंदिर (कारंजा), श्री देवनाथ मठ (अंजनगाव सुर्जी) यांसारखी धार्मिक स्थळे सहज उपलब्ध होतील. यामुळे धार्मिक पर्यटन नकाशावर विदर्भाचा ठळक ठसा उमटेल. हेही वाचा : स्वप्नात नेहमी साप दिसतो ? तर या दोषाचा धोका
 
 
गेल्या काही वर्षांत लोकसभा आणि विधानसभेत अनेक वेळा शकुंतला प्रकल्पावर चर्चा झाली, मात्र ठोस आंदोलन किंवा उपोषण का झाले नाही? लोकप्रतिनिधींनी नागपूर अधिवेशनात हा प्रश्न 'ड्रीम प्रोजेक्ट' म्हणून लावून धरला पाहिजे, अशी मागणी यवतमाळवासीय करत आहेत. नागपूर अधिवेशनात जर विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा झाली नाही, तर अधिवेशनाचा उद्देश काय? असा सवाल अनेकांनी विचारला आहे. Shakuntala Railway Broad Gauge Project शकुंतला रेल्वेमार्गाच्या रूपांतरामुळे यवतमाळ मुंबईशी थेट जोडले जाईल, तसेच पश्चिम विदर्भाला औद्योगिक आणि आर्थिक विकासाची गती मिळेल. पण अद्यापही हा प्रकल्प केवळ फाईलींमध्ये अडकलेला आहे. विदर्भाच्या विकासासाठी शकुंतला रेल्वेमार्ग हा अत्यावश्यक प्रकल्प आहे. नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील मंत्र्यांनी एकत्र येऊन या प्रकल्पाला गती द्यावी, अशी यवतमाळवासीयांची अपेक्षा आहे. नागपूर अधिवेशनात विदर्भाचे खरे प्रश्न सोडवण्यासाठी ठोस निर्णय घेतले जातील का, की याहीवेळी चर्चा फक्त कागदावरच राहील? असे प्रश्न सामान्य जनतेतून विचारले जात आहेत.
विदर्भाच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना देण्यासाठी नागपूर अधिवेशनात 'शकुंतला प्रकल्प' प्राधान्याने मंजूर होण्यासाठी चर्चा झाली पाहिजे. यासाठी विदर्भातील नेत्यांनी ठोस प्रयत्न करावेत. विदर्भवासीयांना आश्वासनांची नाही, तर कृतीची गरज आहे. हेवीवेट मंत्र्यांनी आता 'शकुंतले'साठी आपले वजन वापरले पाहिजे.
अक्षय पांडे (समन्वयक, शकुंतला रेल्वे विकास समिती, यवतमाळ)