पाकिस्तानच्या ग्वादर बंदरावर दहशतवादी हल्ला...कारवाई सुरू !

terror-attack-Pakistan सुरक्षारक्षकांनी आठ दहशतवाद्यांना मारले

    दिनांक :20-Mar-2024
Total Views |
नवी दिल्ली/इस्लामाबाद,
 
terror-attack-Pakistan आर्थिक दिवाळखोरी, बेरोजगारी, अन्नाचा तुटवडा, भीषण भूकंप आणि वाढता जागतिक दबाव अशा समस्यांना तोंड देत असलेल्या पाकिस्तानात आता दहशतवादी हल्ला झाला आहे. terror-attack-Pakistan बलुचिस्तानमध्ये ग्वादर बंदरावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. त्यांना सुरक्षारक्षकांनी चोख प्रत्युत्तर दिले असून, आठ हल्लेखोरांना मारण्यात यश आलं आहे.terror-attack-Pakistan   पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने पाकिस्तान हादरला; 2 ठार, 22 जखमी
 
 
terror-attack-Pakistan
 
ही कारवाई अजून सुरू असल्याचे वृत्त असून, बंदराच्या आतील परिसरात सुरू असलेल्या स्फोटांनी परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. terror-attack-Pakistan वृत्तानुसार, बंदुका आणि स्फोटकं घेऊन अज्ञात हल्लेखोर जीपीए म्हणजेच ग्वादर पोर्ट अथॉरिटीच्या परिसरात घुसले. त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. terror-attack-Pakistan सुरक्षारक्षकांच्या प्रत्युत्तरात ८ दहशतवादी मारले गेले आहेत. बीएलए म्हणजेच बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
 
 
चीन आणि पाकिस्तानच्या आर्थिक कॉरिडॉर परियोजनेत ग्वादर बंदारची भूमिका महत्त्वपूर्ण असून याआधी, गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यातही इथे हल्ला करण्यात आला होता. terror-attack-Pakistan अब्जावधी रुपयांच्या बेल्ट अ‍ॅण्ड रोड इनिशिएटीव्ह ही चीनची महत्त्वाकांक्षी योजना असून, हा प्रकल्प पाकव्याप्त काश्मिरमधून जातो. दरम्यान, हल्ला झाला त्या ठिकाणी मोठ्या संख्येत चीनी मजूर काम करतात.