हे लोक तर हिरो आहेत...भारतीय क्रू मेंबर्सचे अमेरिकेत कौतुक

    दिनांक :27-Mar-2024
Total Views |
मेरीलँड,
Indian crew members अमेरिकेतील मेरीलँडमधील बाल्टिमोर येथे मालवाहू जहाजाची धडक बसल्याने पूल कोसळला आणि नदीत पडला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. या जहाजातील सर्व कर्मचारी भारतीय नागरिक होते. मेरीलँडचे गव्हर्नर वेस मूर यांनी जहाजावर असलेल्या भारतीय क्रू मेंबर्सचे कौतुक केले आहे. राज्यपालांनी त्यांना हिरो म्हटले आहे.मेरीलँडचे गव्हर्नर वेस मूर यांनी सांगितले की, जहाज बाल्टिमोरमधील पुलावर आदळण्यापूर्वी क्रूला इशारा देण्यात आला होता. यानंतर अधिकाऱ्यांनी पुलावरील वाहतूक बंद करून लोकांना तेथून तातडीने बाहेर काढले. अमेरिकेत मालवाहू जहाज पुलाला धडकले
 
creyw
 
गव्हर्नर मूर म्हणाले की क्रूच्या कल्पकतेमुळे जीव वाचविण्यात मदत झाली. हे लोक होरी आहेत. Indian crew members एका अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, मालवाहू जहाजाच्या चालक दलाने हार्बर कंट्रोलला सांगितले होते की त्यांनी जहाजावरील नियंत्रण गमावले आहे. मेरीलँडचे सिनेटर क्रिस व्हॅन हॉलेन यांनी सांगितले की, जहाज पुलावर आदळल्यानंतर नदीत पडले. याचा इशारा त्यांनी आधीच दिला होता. त्यामुळे वाहतूक थांबवून लोकांचे प्राण वाचू शकले.  उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवतात हे ड्राय फ्रूट