मुस्लिम मतदारांनाही हवे पंतप्रधान मोदी

    दिनांक :27-Mar-2024
Total Views |
- 65 मुस्लिम मतदारसंघावर भाजपाची नजर
- लोकोपयोगी योजना सांगताहेत कार्यकर्ते
 
नवी दिल्ली, 
Muslim voters : लोकसभा निवडणुकांच्या तारखा घोषित झाल्या आणि सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले. प्रत्येक जण विजयाचा दावा करीत आहे. सत्तारूढ आणि विरोधकांतही घमासान सुरू आहे. भाजपाने स्वत: 370 आणि रालोआ 400 पारचा नारा दिला आहे. उत्तरप्रदेशसह अनेक राज्यांत Muslim voters मुस्लिम मतदार उमेदवाराला जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. भाजपानेही लोकसभा निवडणुकीत 400 पार साठी मुस्लिम मतदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. अनेक मुस्लिम महिलांना मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान झाल्याचे पाहायचे असल्याचे दिसून आले.
 
 
pm modi
 
65 लोकसभा मतदारसंघांमध्ये Muslim voters मुस्लिम मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे कोण उमेदवार जिंकणार किंवा हरणार याचा फैेसला त्यांच्या मतदानावर अवलंबून असतो. अशा लोकसभेच्या सुमारे 35 ते 40 जागा आहेत जिथे मुस्लिम मतदारांची संख्या 35 ते 70 टक्क्यांहून अधिक आहे. विशेषत: देशभरात भाजपाने निवडल्या गेलेल्या 65 जागांमध्ये मुस्लिम मतदारांची 30 टक्क्यांहून अधिक संख्या आहे. या 65 जागा आसाम, बिहार, उत्तरप्रदेश, दिल्ली, गोवा, हरयाणा, जम्मू-काश्मीर, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमध्ये आहेत. या 65 लोकसभेच्या जागांवर भाजपाने मुस्लिम समाजाला मदत करण्यासाठी बुथ स्तरावर जाण्याचे धोरण अवलंबिले आहे.
कामगार गरीब कल्याण योजनांची माहिती
भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचा असा विश्वास आहे की आतापर्यंत, निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी मतदान करणारे मुस्लिम मतदारांनाही असे वाटू लागले आहे की भाजपाला लोकसभा निवडणुकीत पराभूत करणे अशक्य आहे, म्हणून आता मुस्लिम मतदारही मोदींच्या विजयासाठी हातभार लावत आहेत. भाजपाचे कार्यकर्ते मुस्लिम महिलांना बुथ स्तरावर जाऊन गरीब कल्याण योजनांची माहिती देत आहेत.
 
 
Muslim voters : गेल्या तीन महिन्यांत भाजपाच्या अल्पसंख्यक आघाडीने मुस्लिम समाजातील वेगवेगळ्या विभागांशी संवाद साधण्यासाठी अनेक मोहीम सुरू केल्या आहेत. या आघाडीने मुस्लिम समाजातील 22,700 आपुलकी संवाद आयोजित केले आहेत. या संवाद आणि कार्यक्रमांद्वारे 1,468 विधानसभा मतदारसंघ देशभरात समाविष्ट केले गेले आहे. या कार्यक्रमांद्वारे 50 लाख मुस्लिम लोकांशी संवाद साधण्यात आला. देशातील 543 लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लाखांहून अधिक मुस्लिम मोदी मित्र बनले आहेत. तिहेरी तलाकपासून मुस्लिम महिलांना दिलासा देणार्‍या पंतप्रधान मोदींना महिला मदत करतील.