नागपुरातील 'त्या' नराधामाची फाशी कायम!

    दिनांक :27-Mar-2024
Total Views |
नागपूर,
Nagpur Paltkar Massacre स्वतःचा मुलगा, बहीण, बहिणीचा पती, मुलगी व सासू यांची क्रूरपणे हत्या करणारा नराधमाच्या मरेपर्यंत फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी कायम ठेवली आहे. विवेक गुलाब पालटकर (४०) असे त्याचे नाव असून तो कुटुंबासह दिघोरीतीलआराधनानगर येथे राहत होते.न्यायमूर्ति विनय जोशी व महेंद्र चांदवाणी यांनी हा बहुप्रतिक्षित निर्णय दिला. ११ जून २०१८ रोजी नागपूरमध्ये ही खळबळजनीक घटना घडली होती. मृतकांमध्ये कृष्णा विवेक पालटकर (५), अर्चना कमलाकर पवनकर (४५), कमलाकर मोतीराम पवनकर (४८), वेदांती कमलाकर पवनकर (१२) व मीराबाई पवनकर (७३) अशी यांचा समावेश होता. आरोपीला पत्नीच्या खूनात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्याला न्यायालयातून सोडविण्यासाठी कमलाकर यांचे सुमारे पाच लाख रुपये खर्च झाले होते. त्यामुळे कमलाकर हे पालटकरला पैसे परत मागत होते. पालटकर त्याच्याकडे नवरगाव येथे वडिलोपार्जित दहा एकर शेती असतानाही पैसे परत करत नव्हता. त्यावरून दोघांमध्ये घटनेच्या आठ दिवसांपासून वाद सुरू होता.  'दारू घोटाळ्याचा पैसा गेला कुठे?
 
 
नागपूर, Nagpur Paltkar Massacre स्वतःचा मुलगा, बहीण, बहिणीचा पती, मुलगी व सासू यांची क्रूरपणे हत्या करणारा नराधमाच्या मरेपर्यंत फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी कायम ठेवली आहे. विवेक गुलाब पालटकर (४०) असे त्याचे नाव असून तो कुटुंबासह दिघोरीतीलआराधनानगर येथे राहत होते.न्यायमूर्ति विनय जोशी व महेंद्र चांदवाणी यांनी हा बहुप्रतिक्षित निर्णय दिला. ११ जून २०१८ रोजी रोज नागपूरमध्ये ही खळबळजनीक घटना घडली होती. मृतकांमध्ये कृष्णा विवेक पालटकर (५), अर्चना कमलाकर पवनकर (४५), कमलाकर मोतीर
 
 सलग दोन सामने जिंकून चेन्नई सुपर किंग्ज नंबर 1 त्यामुळे पालटकरने कमलाकर व इतरांना कायमचे संपविण्याचा कट आखला. त्यानुसार, तो रात्री दहाच्या सुमारास कमलाकर यांच्या घरी गेला. दरम्यान, सर्वांनी सोबत भोजन केले. त्यानंतर घराच्या हॉलमध्ये पालटकर व मीराबाई झोपल्या. बेडरुममध्ये कमलाकर, अर्चना, वेदांती व कृष्णा झोपले. Nagpur Paltkar Massacre पालटकरची मुलगी वैष्णवी (१२) व कमलाकर यांची मुलगी मिताली (१४) दुसऱ्या खोलीत झोपल्या होत्या. मध्यरात्री एकच्या सुमारास पालटकर जागा झाला. त्याने सैतानासारखे कमलाकर, अर्चना, वेदांती व कृष्णा यांच्या डोक्यावर लोखंडी सब्बलने जबर वार केला. त्यामुळे चौघेही बेडवरच ठार झाले. त्यांचा आवाज ऐकून मीराबाई बेडरुमकडे धावल्या आल्या असता पालटकरने त्यांना पकडून स्वयंपाकघरात नेले व त्यांनाही डोक्यावर वार करून ठार मारले. त्यानंतर तो लोखंडी गेटवरून खाली उडी मारून पसार झाला. वैष्णवी व मिताली सुदैवाने बचावल्या.