अन् कार्यालयात उशिरा येणाऱ्यांना मिळाली बत्ती...व्हिडिओ

    दिनांक :27-Mar-2024
Total Views |
 वाशीम,
WASHIM IAS वाशीम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी कार्यालयात उशीरा येणाऱ्या अधिकारी व कर्मच्याऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी आज २७ मार्च रोजी कार्यालयात उशिरा येणार्‍या अधिकारी कर्मचारी यांना धक्का दिला. जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीचे तिनही प्रवेशद्वारे सकाळी ९.५० वाजता बंद करुन त्यांना कुलुप लावण्याचे आदेश दिले आणि उशिरा येणार्‍यांना बाहेरच ताटकळत थांबण्याची वेळ आली. नंतर सुमारे ११.१५ वाजता गेटबाहेर येऊन सीईओ वाघमारे यांनी उशिरा येणार्‍या ५० कर्मचार्‍यांची चांगलीच कानउघडणी केली.
जिल्हा परिषदेत मार्च एंडच्या कामाची लगबग सुरु असून, सकाळी- सकाळी जिल्हा परिषदेचे तीनही चॅनल गेट कुलुप बंद दिसल्याने काही क्षण कर्मचार्‍यांसह बाहेरुन येणारे नागरिकही बुचकाळ्यात पडले होते. कार्यालयात येण्यास उशिर होत असल्यास जिल्हा परिषदेच्या व्हॉटस्अप ग्रुपवर संदेश टाकण्याचे निर्देश यापूर्वीच सीईओ वाघमारे यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दिले होते. तरीही आज सुमारे ५० कर्मचारी कार्यालयीन वेळेपेक्षा उशिरा आल्याने त्यांनी कर्मचार्‍यांसमोर आपला संताप व्यक्त केला. 
 

WASHIM 
WASHIM IAS त्यामुळे लेटलतीफ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या बाहेरच उभे रहावे लागले. यावेळी उशिरा आलेल्या सर्व कर्मचार्‍यांनी वैयक्तिकरित्या जाहिर माफी मागीतल्यामुळे व यापुढे कार्यालयात येण्यास उशिर होत असल्यास जिल्हा परिषदेच्या ग्रुपवर संदेश टाकण्याची हमी दिल्यामुळे आज उशिरा आलेल्या कोणत्याही कर्मचार्‍यांवर प्रशासकीय कार्यवाही करण्यात आली नाही. ही शिक्षा उशिरा येण्याबद्दल नाही तर, ग्रुपवर न कळवल्याबद्दल असल्याचे सीईओ वाघमारे यांनी यावेळी ठणकाऊन सांगितले. राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा केल्यानंतर बदललेल्या वेळेनुसार जिल्हा परिषदेची कार्यालयीन वेळ ही सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ आहे. वेळ बदलली तरी अनेक कर्मचारी बदललेल्या वेळेनुसार कार्यालयात हजर होत नाहीत. अनेक कर्मचारी सकाळी ११ वाजेपर्यंत, तर कुणी १२ वाजेपर्यंत आपल्या मनमर्जीने कार्यालयात येतात. उशिरा येण्याचा हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता. मात्र, वाघमारे यांनी या प्रकाराला गांभीर्याने घेत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी वेळेचे बंधन पाळण्याचे निर्देश दिले. एवढेच नाही तर ते स्वत: दररोज सकाळी ९.४५ वाजता आपल्या कार्यालयात हजर होतात. मात्र ते स्वत: जेव्हा जिल्हा परिषदेत येतात तेव्हा वाहनांची संख्या कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी यापूर्वी प्रत्यक्ष विभागांना जाऊन पाहणीही केली होती. त्यानंतर घरगुती अडचणींमुळे कार्यालयात येण्यास उशिर होणार असल्यास जिप च्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर संदेश टाकणार्‍या कर्मचार्‍यांना अर्धातास उशिरा येण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, अनेक कर्मचारी ग्रुपवर न कळवताच नियमित उशिरा यत असल्याची बाब आयएएस असलेल्या सीईओ वाघमारे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आज जि प च्या मुख्य इमारतीचे तीनही गेट बंद करण्याचे आदेश दिले. नंतर बाहेर येऊन उशिरा येणार्‍यांची चांगलीच कानउघडणी केलीअशा कडक सुचना देण्यात आल्या. त्यामुळॆ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनामध्ये तारांबळ उडाली.  नागपुरातील 'त्या' नराधामाची फाशी कायम!