तुमची झोप पूर्ण होत नाही का? या सवयी बदला

    दिनांक :28-Mar-2024
Total Views |
sleep not complete झोप पूर्ण न होणे आणि शांत झोप न लागणे यामुळे इन्सुलिन आणि कोर्टिसोलसारख्या हार्मोन्सचे असंतुलन निर्माण होते, जे चयापचय क्रियेत अडथळा निर्माण करते आणि लठ्ठपणा आणि मधुमेह होण्याचा धोका वाढवते. चयापचय हे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि एकूण आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ही एक गुंतागुंतीची जैवरासायनिक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये तुम्ही जे अन्न खाता आणि पेय पिता त्याचे ऊर्जेमध्ये रूपांतर होते.
 

sleep 
 
पण, जीवनशैलीतील विविध घटक आणि सवयी या नाजूक संतुलनामध्ये अडथळे निर्माण करू शकतात, ज्यामुळे तुमची चयापचय प्रक्रिया बिघडू शकते. अलीकडेच, पोषणतज्ज्ञ आणि वजन कमी करण्याचे प्रशिक्षक सिमरन खोसला यांनी पाच सवयींबाबत सांगितले, ज्यामुळे तुमचे चयापचय बिघडू शकते.  गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, उद्धवचा ताण वाढणार: बघा व्हिडीओ
सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता
खोसला यांनी सांगितले की, मानवी शरीर व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी सूर्यप्रकाशावर अवलंबून असते. व्हिटॅमिन डी हे चयापचय कार्यात एक महत्त्वपूर्ण घटक आहे. “पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्यास आपल्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता होते, ज्यामुळे शरीराची ऊर्जा निर्माण करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. तसेच, पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्यास शरीराचे सर्कॅडियन लय म्हणजेच जैविक चक्रमध्ये (झोपण्याची -उठण्याची वेळ) यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, जे मेलाटोनिन आणि सेरोटोनिनसारख्या चयापचय-नियमन हार्मोन्सवर परिणाम करते”, असेही खोसला यांनी स्पष्ट केले.
झोप पूर्ण न होणे
खोसला यांच्या मते, चयापचय उत्तम प्रकारे कार्य करण्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक असते, कारण ते लेप्टिन आणि घेरलीन सारखे हार्मोन्सचे नियंत्रण करते. झोप पूर्ण न होणे आणि शांत झोप न लागणे यामुळे इन्सुलिन आणि कोर्टिसोलसारख्या हार्मोन्सचे असंतुलन निर्माण होते, जे चयापचय क्रियेत अडथळा निर्माण करते आणि लठ्ठपणा आणि मधुमेह होण्याचा धोका वाढवते.
भरपूर प्रमाणत जंक फूड खाणे
खोसला यांच्या मते, प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये भरपूर साखर, आरोग्यासाठी धोकादायक फॅट्स आणि कृत्रिम पदार्थ असतात जे चयापचय प्रक्रिया बिघडवण्यास कारणीभूत ठरतात. अशा पदार्थांमधील कॅलरीचे पोषण मूल्य कमी असते. अशा पोषक मूल्य कमी असलेल्या कॅलरीजच्या सेवनामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि कालांतराने इन्सुलिन रेझिस्टन्स आणि चयापचय कार्य बिघडू शकते.”  Instagram ची छुट्टी करेल Bill Gates ची कंपनी...

रात्रीच्या वेळी फोन वापरणे 
सतत फोन आणि लॅपटॉप वापरण्याच्या आपल्या सवयीमुळे आपण नेहमी ब्ल्यू लाईटच्या संपर्कात येतो, जे शरीराच्या नैसर्गिक जैविक चक्रामध्ये अडथळा निर्माण करते. या अडथळ्यामुळे आपल्या झोपेवर आणि चयापचय प्रक्रियेवर विपरित परिणाम होतो. त्यामुळे वजन वाढणे आणि चयापचयाचे विकार होऊ शकतात, असेही खोसला यांनी सांगितले आहे.
ताण-तणाव
खोसला यांनी सांगितले की, “दीर्घकालीन ताण-तणावामुळे आपल्या शरीरातील प्राथमिक स्ट्रेस हार्मोन्स कोर्टिसोलच्या उत्सर्जनास चालना मिळते. उच्च कॉर्टिसोल पातळीमुळे भूक वाढू शकते, उच्च-कॅलरी पदार्थांची लालसा आणि अतिरिक्त फॅट्स साचणे या सर्व गोष्टी चयापचय संतुलनात व्यत्यय आणतात.”  अरे देवा! मुंबई इंडियन्सला मोठा धक्का...
आपल्या चयापचयाशी संबंधित इतर सामान्य चुकांबाबत सांगताना पालघर येथील लाइफलाइन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे सल्लागार फिजिशियन, अधिकारी, डॉ. दीपक पाताडे यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला माहिती देताना सांगितले की, क्रॅश डाएट किंवा दररोज सामान्य किंवा सवयीपेक्षा कमी कॅलरीजचे सेवन करणे, जेवण न करणे, विशेषत: नाश्ता, कॅफीन किंवा एनर्जी ड्रिंक्सवर अत्याधिक अवलंबून राहणे आणि शरीरातील पाण्याच्या पातळीकडे दुर्लक्ष केल्याने चयापचय प्रक्रिया बिघडू शकते आणि एकूण ऊर्जा पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे दैनंदिन कामकाजात अडथळा येतो.sleep not complete रोजच्या जीवनशैलीतील या अडचणी टाळून आणि पोषण, व्यायाम, झोप आणि तणाव व्यवस्थापन याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. हा संतुलित दृष्टीकोन स्वीकारल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते आणि त्याची चयापचय प्रक्रिया अधिक चांगली होते”, असा त्यांनी निष्कर्ष काढला.