युवकांनी शिवाजी महाराजांचे गुण आत्मसात करावे

शिवजन्मोत्सव सोहळा कार्यक्रम

    दिनांक :29-Mar-2024
Total Views |
डॉ. मोहनजी भागवत यांचे आवाहन
नागपूर,
Mohanji Bhagwat छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त पूजा अर्चना करण्यासोबतच शिवाजी महाराजांचे गुण प्रत्येक युवकांनी आत्मसात करण्याची नितांत गरज असल्याचे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुने यशोधरा पोलिस स्टेशनजवळ, कामठी रोड येथे शिवजन्मोत्सव सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने भागीरथी महाराज , नंदकिशोर कावळे, दिनेश यादव, महानगर संघचालक राजेश लोया उपस्थित होते.  'नोटा'ला नाही, 'बेस्ट'ला निवडा !Video
 
 
Mohanji Bhagwat
 
मोहनजी आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले, नवयुवकांवर चांगले संस्कार व्हायला हवेत, यासाठी शिवजयंतीला किमान दोन चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा संकल्प करावा. Mohanji Bhagwat तसेच आपल्या देशाला समृध्द आणि शक्तीशाली करण्यासाठी सुसंस्कारीत पिढीची नितांत गरज आहे. यामुळेच आपल्या देशाला योग्य दिशा मिळणार आहे. समर्थ, शकतीशाली भारताला विश्वगुरु करण्यासाठी प्रत्येक युवकांचे योगदान मोलाचे आहे. शिवाजी महाराजांच्या आदर्श गुणांचे अनुसरण केल्यास आपले जीवन उज्ज्वल होईल, असा विश्वास व्यकत केला.  तुमची मुलेही देतात का उलटउत्तर,या 5 टिप्स फॉलो करा

शिवाजी महाराजांचा आदर्श बाळगा
छोटया छोटया गोष्टीतून मोठे कार्य करण्याचे कौशल्य शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारखे आहे. Mohanji Bhagwat प्रचंड आत्मविश्वासाच्या जोरावरच त्यांनी स्वराज्य मिळवून दिले आणि अखेरपर्यंत त्यांनी धर्माचे पालन केले. नि:स्वार्थ कार्यामुळेच शिवाजी महाराजांना मोठे यश मिळविता आले. जयंती, उत्सव, महोत्सवाच्या कार्यक्रमातून शिवाजी महाराजांचा आदर्श बाळगण्याची आवश्यकता आहे.
युवकांवर चांगले संस्कार व्हायला हवेत
याप्रसंगी भागीरथी महाराज यांनी सांगितले की, अयोध्येत रामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देशातील वातावरण राममय झाले आहे. शिवाजी महाराजांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे युवकांवर चांगले संस्कार व्हायला हवेत. शिवजयंती निमित्त समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रामुख्याने महाकाल आरती पथकासह लेझीम पथक, शंख पथकाचे सादरीकरण झाले. याप्रसंगी मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय कांडलकर, कैलाश शुक्ला, सूरज नरवडिया आदींनी परिश्रम घेतले.