अरविंद केजरीवालांनी घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव

    दिनांक :10-Apr-2024
Total Views |
नवी दिल्ली,
Arvind Kejriwal दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर मंगळवारी निर्णय देताना दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नाही. तपास यंत्रणा ईडी (अंमलबजावणी संचालनालय) ने केलेली अटक योग्य असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले होते. याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जिथे दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे. केजरीवाल यांचे वकील आज सकाळी कोर्टात हजर राहून या खटल्याच्या सुनावणीची मागणी करणार आहेत.  संजय सिंह आणि भगवंत मान यांना केजरीवालांना भेटता येणार नाही!
 
 
kejari
 
महाकाल मंदिरातील आगीत होरपळलेले सत्यनारायण सोनी यांचा मृत्यू   उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा न मिळाल्याने आम आदमी पक्षाने (आप) मंगळवारी सांगितले की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात जातील. AAP ने असा दावा केला की, "तथाकथित अबकारी धोरण घोटाळा हा केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला संपवण्याचा सर्वात मोठा राजकीय कट आहे." कथित अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने केजरीवाल यांना अटक केली आहे. Arvind Kejriwal उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काही वेळातच आपचे ज्येष्ठ नेते आणि दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सर्वोच्च न्यायालय पक्षाच्या राज्यसभा सदस्याला दिला होता तसाच दिलासा सर्वोच्च न्यायालय अरविंद केजरीवाल यांना देईल. संजय सिंग यांना जामीन मंजूर झाला.  विदर्भ-मराठवाड्यात पुन्हा बसणार अवकाळीचा तडाखा