मुख्यमंत्र्यांनी केली सलमानची विचारपूस !

Salman-Shinde-security सुरक्षेत केली वाढ

    दिनांक :14-Apr-2024
Total Views |
मुंबई,
 
 
Salman-Shinde-security बॉलीवूडचा दंग अभिनेता सलमान खानच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी आज सकाळी साडे पाचच्या सुमारास गोळीबार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. Salman-Shinde-security मुख्मंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची दखल घेत, सलमानची विचारपूस केली आहे. सलमानला त्याच्या सुरक्षेसंदर्भात दिलासा देण्यासह, मुख्मंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेत्याच्या सुरक्षेत वाढ करण्याचीही घोषणा केली आहे.
 

Salman-Shinde-security 
 
 
Salman-Shinde-security मायानगरी मुंबईत तणावाचे वातावरण निर्माण करणारी ही घटना असून, कलाकारांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्मंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान, पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रीया सुरू आहे. Salman-Shinde-security या प्रकरणी अद्याप कोणावर संश नसला तरी आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच, कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारलेली नाही.
 
 
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, या प्रकरणी पोलिस तपास सुरू असून, त्यातूनच खरी माहिती पुढे येईल. तोपर्यंत या प्रकरणात काही बोलता येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. Salman-Shinde-security सलमान खानच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊतांनी महायुती सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मुंबईसह महाराष्ट्राची कायदा आणि व्यवस्था उध्वस्त झाली असून, गृहमंत्री राजकारणात व्यस्त आहे. पोलिसांची सुरक्षा सत्ताधारी पक्षाच्या चिल्लर कार्यकर्त्यांनी मिळत असल्याची टीकाही राऊत यांनी केली आहे.Salman-Shinde-security