सलमान आणि लॉरेन्स बिश्नोईमध्ये शत्रुत्वाचे कारण काय ?

    दिनांक :15-Apr-2024
Total Views |
मुंबई,  
Salman-Lawrence Bishnoi 14 एप्रिल 2024 रोजी मुंबईत सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला तेव्हा सगळ्यात आधी लॉरेन्स बिश्नोई यांच्या शत्रुत्वाच्या आठवणी ताज्या झाल्या, जी गेल्या 6 वर्षांपासून सुरू आहे. सलमानच्या घरावर झालेल्या गोळीबारामागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याचे बोलले जात आहे. 2018 पासून सलमान खानला फॉलो करणाऱ्या लॉरेन्सने त्याच्यावर हल्ल्याचा कट रचला होता. शेवटी लॉरेन्स बिश्नोई सलमान खानचा शत्रू का? या मागची संपूर्ण कहाणी आम्ही तुम्हाला सांगतो.  एलन मस्कच्या टेस्लामध्ये लागणार टाटाचे चिप्स
 
Salman-Lawrence Bishnoi
सलमान खानच्या घरावर फायरिंग...  1998 मध्ये सलमान खानवर काळवीटाची शिकार केल्याचा आरोप होता. या प्रकरणावरून बराच गदारोळ झाला होता. जोधपूरमध्ये 'हम साथ साथ है' चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने शहरालगतच्या कांकणी गावाजवळ काळवीट मारल्याचा आरोप सलमानवर होता. राजस्थानमधील बिश्नोई समाज काळवीटांना आपले देव मानतो. Salman-Lawrence Bishnoi त्यांच्यामध्ये काळ्या हरणाची पूजा केली जाते. अशा परिस्थितीत सलमान खान बिष्णोई समाजाच्या निशाण्यावर आला. प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचले. 
तेव्हापासून लॉरेन्स बिश्नोई हा सलमान खानचा शत्रू राहिला आहे. 2023 मध्ये लॉरेन्स बिश्नोईने तुरुंगातूनच एक व्हिडिओ जारी केला होता. या व्हिडिओमध्ये लॉरेन्सने सलमान खानने माफी मागितली नाही तर त्याचे वाईट परिणाम होतील, अशी धमकी दिली आहे. व्हिडिओ शेअर करण्यापूर्वी लॉरेन्सने सलमान खानच्या हत्येचा दोनदा कट रचला होता. या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने सलमान खानला Y+ सुरक्षा दिली आहे. त्याच्या घराबाहेरही सुरक्षा कडक आहे. मात्र, रविवारी सलमानच्या घराच्या बाल्कनीच्या दिशेने गोळीबार झाल्याने त्याचे चाहतेही घाबरले.  भाजपचा विजय रथ रोखणे शक्य ?