राणा - अडसूळ यांच्यातील राजकीयवाद संपुष्टात

    दिनांक :17-Apr-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
अमरावती, 
Rana and Adasul श्रीराम नवमीच्या मुहूर्तावर राणा व अडसूळ यांच्यातील राजकीय वाद संपुष्टात आला आहे. अमरावतीत हा वाद सर्वाधिक चर्चेपैकी एक होता. गेल्या दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेचे आनंदराव अडसूळ व नवनीत राणा यांच्यात थेट लढत झाली होती. एकदा अडसूळ तर दुसऱ्यांदा नवनीत विजयी झाल्या होत्या. पण, नवनीत यांच्या जात प्रमाणपत्रावरून अडसूळ न्यायालयात गेले होते. उच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल देऊन नवनीत यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले होते. या निर्णयाला नवनीत यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. या प्रकरणाचा निकाल नुकताच जाहीर झाला.
 
 
kanha
 
न्यायालयाने नवनीत यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरविले होते.तेव्हापासून अडसूळ व राणा यांच्यातले राजकीय वैर संपुष्टात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. त्या प्रयत्नांना यश आले असून बुधवारी श्रीराम नवमीच्या मुहूर्तावर राणा दाम्पत्य अडसूळ यांच्या नवसारी येथील निवासस्थानी पोहोचले. Rana and Adasul आनंदराव यांचे पुत्र व माजी आमदार अभिजीत अडसूळ व त्यांच्या पत्नी यांनी राणा दाम्पत्याचे स्वागत केले. त्यानंतर अडसूळ दाम्पत्याचा राणा दाम्पत्याने भगवी शाल देऊन सत्कार केला. यावेळी बोलताना अभिजीत यांनी मोदींसाठी काम करायचे आहे असे सांगून शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या कोर कमिटी मध्ये सविस्तर चर्चा चर्चा करून सर्व ठरवणार आहे. इकडून तिकडून निरोप पाठवण्याऐवजी थेट संपर्क ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली. शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने हजर होते.