चंद्रपूर लोकसभेसाठी उद्या मतदान

*18 लाख 37 हजार मतदार बजावणार हक्क * मतदार संघात पोलिंग पार्टी रवाना

    दिनांक :18-Apr-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर, 18 एप्रिल
Chandrapur Lok Sabha Poll : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात शुक्रवार, 19 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. 9 हजार 811 अधिकारी-कर्मचार्‍यांसह पोलिस विभाग निवडणुकीसाठी सज्ज आहे. गुरूवारी पोलिंग पार्टी आपल्या निर्धारित मतदान केंद्रावर रवाना झाली. 18 लाख 37 हजार 906 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मुनगंटीवार यांना शुभेच्छा
 
 
JSAD
 
 
भाजपाचे सुधीर मुनगंटीवार, इंडियन नॅशनल काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर, वंचित बहुजन आघाडीचे राजेश बेले, बसपाचे राजेंद्र हरिश्चंद्र रामटेके यांच्यासह निवडणुकीच्या रिंगणातील 15 उमेदवारांचे भाग्य मशीनबंद होणार आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोडा, वणी, आर्णी या सहा विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. या मतदारसंघात एकूण 2 हजार 118 मतदान केंद्रे आहेत. तर 18 लाख 37 हजार 906 सर्वसाधारण मतदार आहेत. त्यात पुरूष 9 लाख 45 हजार 736, तर 8 लाख 92 हजार 122 महिला मतदारांचा समावेश आहे. 24 हजार 120 युवा मतदार आहेत.
 
 
सर्व मतदान केंद्रावर तप्त उन्हापासून संरक्षणासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदाराकरिता त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने ‘व्हीलचेअर’ची व्यवस्था करण्यात आली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 196 विशेष मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. 6 आदर्श मतदान केंद्र, तर 6 आदर्श मतदान केंद्रे आहेत. 11 हजार 242 ओआरएस पाकिटे मतदान कर्मचार्‍यांना वितरित करण्यात आली आहेत.
 
 
सहाही मतदारसंघात बीयू सयंत्र, सीयू सयंत्र, आणि व्हीव्हीपॅड वितरित करण्यात आले आहेत. मतदान केंद्राध्यक्ष 2 हजार 453, प्रथमत मतदान केंद्र अधिकारी 2 हजार 453, इतर मतदान अधिकारी 4 हजार 905 असे एकूण 9 हजार 811 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय निवडणुक कामकाजाच्या अनुषंगाने 109 जीप, 199 बस, 79 मिनी बस अशी एकूण 379 वाहने आरक्षित केली आहेत.