निवडणुकीसाठी पोलिस यंत्रणा सज्ज

पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यासह गृहरक्षक दल व केंद्रीय पोलिस दलाच्या 15 तुकड्या तैनात

    दिनांक :18-Apr-2024
Total Views |
गोंदिया, 
Police system ready for election, : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होत आहे. मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.
 
 
fjsaIF
 
पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या संपूर्ण देखरेखीखाली जिल्ह्यातील निवडणूक सुरळीत पार पाडण्याकरिता तसेच कायदा सुव्यवस्था, शांतता अबाधित राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. जिल्ह्यात 1288 मतदान केंद्र असून यातील 112 मतदान केंद्र संवेदनशील आहेत. या केंद्रावर 9 वरीष्ठ पोलिस अधिकारी, 97 पोलिस अधिकारी, 1916 पोलिस व अंमलदार व कर्मचारी बंदोबस्त असे एकूण 2022 पोलिस अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. तसेच गृहरक्षक दलाचे 1393 जवान व केंद्रीय पोलिस दलाच्या 15 तुकड्या तैणात करण्यात आल्या आहेत. नक्षल प्रभावित भागात पोलिसांची राहणार विशेष नजर राहणार आहे. नक्षलग्रस्त भागातील एकूण 6 पोलिस स्टेशन, 11 सशस्त्र दूरक्षेत्र अंतर्गत मतदान केंद्रावरील, केंद्राबाहेर संरक्षण, परिसर बंदोबस्तकरीता संबंधित पोलिस स्टेशन, सशस्त्र दूरक्षेत्र स्तरावर पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. तसेच सी 60 पार्ट्या, एसजी पार्ट्या. केंद्रीय पोलिस दल, राज्य राखीव पोलिस दलाचे बंदोबस्तावर लक्ष राहणार आहे.
 
 
जिल्हास्तरावर वेळीच उद्भवणार्‍या घटना परिस्थिती संबंधाने जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष येथे तर जिल्ह्यातील 4 पोलिस उपविभाग स्तरावर आणि 16 पोलीस ठाण्याअंतर्गत अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.