पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी तळेगाव सज्ज

*खा. रामदास तडस यांची प्रचार सभा *1500 पोलिस, बसल्या जागी पाणी, आरोग्य सुविधाही

    दिनांक :18-Apr-2024
Total Views |
गोपाल चिचाटे
तळेगाव (श्या.पंत),
Talegaon-MP Ramdas Tadas : वर्धा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार रामदास तडस त्यांच्या प्रचाराकरिता शुक्रवार 18 रोजी दुपारी 3 वाजता येथील 60 एकर असलेल्या चेतना ग्राउंडवर पंतप्रधान नरंंेंद्र मोंदी यांच्या विशाल सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेकरिता 1 लाख नागरिक येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता सभास्थळीच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी दिली.
 
 
jaDKL
 
 
वर्धा लोकसभेचे उमेदवार रामदास तडस व अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या उमेदवारीसाठी आष्टी शहीद तालुक्यात येणार्‍या आणि जंगल सत्याग्रहाकरिता ओळखल्या जाणार्‍या तळेगाव येथे होणार्‍या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीयमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार असुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीची शक्यता असल्याचे गफाट यांनी सांगितले. तळेगाव येथे प्रथमच भव्य सभा होणार असल्याने परिसरात प्रचंड उत्कंठा लागून आहे. सभेकरिता 3 डोम उभारण्यात आले असुन व्यासपीठावर 40 मान्यवरांसाठी बसण्याची व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर पार्किंगमध्ये गावातील सामाजिक व धार्मिक संस्थांच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे परिसरात आरोग्य सुविधाही उपलब्ध राहणार आहेत. पोटे कॉलेज समोर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असल्याचे भाजपा नेते सचिन होले यांनी सांगितले.
 
 
सभेच्या सुरक्षेकरिता 10 पोलिस अधीक्षक, 40 अतिरिक्त पोलिस अधीक्षक, 100 पोलिस निरीक्षक, 200 पोलिस उपनिरीक्षक, 1500 पोलिस कर्मचारी, आरपीएफ, सीआरपी, दंगा नियंत्रक तैनात करण्यात राहणार आहेत. सभास्थळी वाहनांच्या रिमोट चाबी, पाण्याच्या बॉटल नेण्यास मज्जाव असल्याचे सांगण्यात आले.
 
 
सभास्थळीच उतरतील पंतप्रधान
 
सभेकरिता पाच हेलिकॉफ्टर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तीन हेलिकॉफ्टर सभास्थळापासुन अवघ्या 300 मिटरवर तयार करण्यात आले आहे. दोन हेलिकॉफ्टरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत.