मुंबई,
Mandlekar-quits-acting छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर साकारून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळविलेला अभिनेता चिन्मय मांडलेकरने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्याने यापुढे शिवरायांची भूमिका साकारणार नसल्याचे समाज माध्यमांवर पोस्ट करून जाहीर केले आहे. Mandlekar-quits-acting चिन्मय आणि त्याची पत्नी नेहाने त्यांच्या मुलाचे नाव जहांगीर ठेवले. त्याने एका मुलाखतीत यासंदर्भात ही माहिती दिली होती. त्यानंतर समाज माध्यमातून जोरादार टीका झाली. इतकेच नव्हे तर, पत्नी व मुलावरही वाईट भाषेत टिप्पणी करण्यात आली. Mandlekar-quits-acting चिन्मयने मुलाचे नाव जहांगीर का ठेवले, याबद्दल स्पष्टीकरण दिले. मात्र, टीका कमी झाली नाही.
नुकताच त्याची बायको नेहा जोशी-मंडलेकर हिने एक व्हिडिओ शेअर करत ट्रोलर्सना चोख उत्तरदेखील दिलं होतं. इतकच नव्हे तर चिन्मयला काहींना पाकिस्तान किंवा आफगणिस्तानमध्ये जाण्याचा देखील सल्ला दिला. Mandlekar-quits-acting पण नेहाच्या या व्हिडिओनंतर आता चिन्मयने देखल त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. चिन्मयने हा व्हिडिओ शेअर करत एक मोठा निर्णय देखील घेतला आहे. दरम्यान, चिन्मयने आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. Mandlekar-quits-acting या सगळ्या घटनाक्रमानंतर यापुढे छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार नसल्याचे त्याने जाहीर केले. कुटुंबाला मानसिक त्रास नको, त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचे चिन्मयने सांगितले.
''हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्या कमी झाल्या का तर नाही. उलट आता त्या जास्त वाढल्या आहेत. आता तर लोकं त्याच्या पितृत्वापासून ते आईच्या चारित्र्यापर्यंत सगळ्यावर कमेंट्स करतायत. Mandlekar-quits-acting एक व्यक्ती म्हणून त्याचा मला त्रास होतोय. मी अभिनेता आहे; पण म्हणून माझ्या मुलाला किंवा माझ्या पत्नीला सोशल मीडियावरून कुठल्याही पद्धतीचा जर मानसिक त्रास होत असेल, तर त्याच्यासाठी मी बांधील नाहीय. माझ्या कामावरून तुम्ही मला वाटेल ते बोलू शकता. तुम्हाला ते आवडलं, नाही आवडलं ते तुम्ही प्रत्यक्षात भेटून किंवा सोशल मीडियावरही सांगू शकता. Mandlekar-quits-acting पण, माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्याचा हक्क तुम्हाला आहे, असं मला वाटत नाही. मी माझ्या मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं याच्याबद्दल आजपर्यंत अनेक माध्यमांवरून मी यापूर्वी बोललो आहे. काल नेहानंसुद्धा जेव्हा व्हिडीओ बनवला तेव्हा त्याची कारणमीमांसा केली म्हणून ती करण्याकरिता मी आता वेळ वाया घालवणार नाही.”
व्हिडिओमध्ये चिन्मय पुढे म्हणाला की, 'मला इतकंच सांगायचंय. मी छत्रपती शिवरायांची भूमिका करतो. मी आतापर्यंत सहा चित्रपटांमध्ये ती केली आणि तरीही माझ्या मुलाचं नाव जहांगीर का? असा त्या ट्रोलिंगचा प्रमुख सूर आहे. माझ्या मुलाचा जन्म २०१३ मध्ये झालाय. Mandlekar-quits-acting आज तो अकरा वर्षांचा आहे आणि हे ट्रोलिंग मला तेव्हा नाही झालं. हे आता होतंय. मला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेनं आतापर्यंत खूप काही दिलं. महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्राबाहेरच्या फक्त मराठीच नाही, तर अमराठी लोकांचंसुद्धा प्रेम दिलं. पण, आता त्या भूमिकेमुळे जर माझ्या कुटुंबाला अशा पद्धतीचा त्रास होत असेल, तर मी अत्यंत नम्रतापूर्वक हे सांगू इच्छितो की, इथून पुढे मी ही भूमिका करणार नाही. Mandlekar-quits-acting मी करीत असलेलं काम, मी करीत असलेली भूमिका यांचा जर माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास होत असेल, तर एक वडील म्हणून, नवरा म्हणून व एक कुटुंबप्रमुख म्हणून मला माझं कुटुंब जपणं जास्त महत्त्वाचं आहे.'
'मला याचं वाईट वाटतंय का? तर हो मला खूप वाईट वाटतंय. माझ्या मनात महाराजांबद्दलची जी भक्ती किंवा श्रद्धा आहे. त्याच भक्ती आणि श्रद्धेची एक अभिव्यक्ती म्हणजे माझी भूमिका होती. अगदी माझ्या गाडीतसुद्धा जिथे लोक साधारणपणे गणपतीची मूर्ती ठेवतात तिथे महाराजांची मूर्ती आहे आणि हा दिखावा नाही तर हे प्रेम आहे. Mandlekar-quits-acting ही श्रद्धा आहे. पण, आपल्या श्रद्धेचं स्पष्टीकरण मी लोकांना का द्यावं? आणि लोकांनी तरी ते का ऐकावं. त्यांना काय दिसतं, तर मुलाचं नाव जहांगीर ठेवलं. पण, जर महाराजांची भूमिका मी केली म्हणून माझ्या कुटुंबाला आणि माझ्या ११ वर्षांच्या मुलाला या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत असेल, तर त्यांची माफी मागून मी तुम्हा सगळ्यांसमोर हे जाहीर करू इच्छितो की, इथून पुढे मी महाराजांची भूमिका करणार नाही. नमस्कार,' असं वक्तव्य करणारा व्हिडीओ चिन्मयने पोस्ट केला आहे. Mandlekar-quits-acting