नौदलाच्या दोन हेलिकॉप्टरचा अपघात

    दिनांक :21-Apr-2024
Total Views |
टोकियो,  
helicopters crash जपानमध्ये प्रशिक्षणादरम्यान नौदलाचे दोन हेलिकॉप्टर प्रशांत महासागरात कोसळले. या घटनेची माहिती देताना जपानचे संरक्षण मंत्री मिनोरू किहारा म्हणाले की, शनिवारी रात्री उशिरा तेरिशिमा बेटाजवळ दोन एसएस-60 हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. प्रत्येक हेलिकॉप्टरमध्ये चार जण होते. आठ कर्मचाऱ्यांपैकी एकाला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, अधिकारी अजून सात जणांचा शोध घेत आहेत.  पानिपतमधील तरुणाचे कॅनडात शवविच्छेदन

helicopters crash
साप्ताहिक राशीभविष्य   विशेष म्हणजे हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती समोर आलेली नाही. जानेवारी 2022 मध्ये, एअर सेल्फ-डिफेन्स एफ-15 फायटर जेट जपानच्या उत्तर-मध्य किनाऱ्यावर कोसळले आणि दोन क्रूचा मृत्यू झाला होता. किहारा म्हणाले की सिकोर्स्कीने डिझाइन केलेले आणि सीहॉक नावाने ओळखले जाणारे ट्विन-इंजिन मल्टी-मिशन विमान रात्रीच्या वेळी पाण्यात पाणबुडीविरोधी प्रशिक्षण घेत होते. helicopters crash शनिवारी रात्री 10:38 वाजता एकाचा संपर्क तुटला. सुमारे 25 मिनिटांनंतर दुसऱ्या विमानाशी संपर्क तुटला. एक नागासाकीच्या हवाई तळाशी आणि दुसरा टोकुशिमा प्रांतातील तळाशी संबंधित होता. अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की शनिवारच्या प्रशिक्षणात फक्त जपानी नौदलाचा समावेश होता.