राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यसाठा व 22 वाहनांसह 36 लाखांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :23-Apr-2024
Total Views |
चिखली,
State Excise Department : राज्य उत्पादन शुल्क विभागाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याभरात बेकायदा दारूविक्रीच्या 204 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. यामध्ये 4 ठिकाणी मोठी कारवाई केली असून मद्यसाठा, 19 दुचाकी व 3 चारचाकी वाहनासह सुमारे 36 लांखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 
 
 
fjsaKfjd
 
प्रत्यक्ष मतदानाच्या पूर्वसंध्येला व मतदानाच्या दिवशी मद्यवाटप होऊ नये यावर उत्पादन शुल्कची भरारी पथके लक्ष ठेवून आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून मद्यविक्री करणाजया दुकानांची रोजची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग घेत आहे. त्याचबरोबर चोरट्या पद्धतीने सुरू असलेली दारूची वाहतूक, दारूविक्रीवर पथके कारवाई करत आहेत. यानुषंगाने जिल्हा अधिक्षक भाग्यश्री जाधव यांनी जिल्ह्यामध्ये विशेष पथके तैनात केली आहेत. या पथकामार्फत आचारसंहिता काळात 23 एप्रिलपर्यंत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान एकूण 204 गुन्हे नोंदविण्यात आले असून 200 वारस गुन्हयात 208 आरोपींना अटक करण्यात आली.
 
 
 
तसेच 22 वाहनांसह एकुण 35 लाख 83 हजार 670 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान या विशेष मोहिमेअंतर्गत मलकापूर दुय्यम निरीक्षक शिंदे व जवान ए.पी.सुसरे यांच्या पथकाने 23 एप्रिल रोजी बोदवड मलकापुर रोडवर बोदवड जि.जळगाव येथे दारूची अवैध वाहतूक करणाजया एका चारचाकी वाहनातून 25.92 लीटर देशी व 17.32 लीटर दारूसह 2 लाख 35 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर चिखली निरीक्षक रोकडे, मेहकर दु.नि.नयना देशमुख, स.दु.नि.पहाडे, जवान तिवाने व संजीव जाधव यांच्य पथमाने सिंदखेडराजा तालुक्यातील नशिराबाद फाट्याजवळील नाईक नगर, येथे एका पिकअप बोलेरो वाहनातून 190.08 लीटर देशी व 8.64 लीटर विदेशी दारु असा 7 लाख 31 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान बुलढाणा निरीक्षक के.आर.पाटील, स.दु.नि.निलेश देशमुख जवान अवचार व विशाल पाटील यांच्या पथकाने देऊळघाट येथील एका घरातून 264.96 लीटर देशी मद्यासह आरोपीस ताब्यात घेत 1 लाख 3 हजार 40 रुपयांचा मुद्येमाल जप्त केला आहे. तर याच पथकाने देऊळघाट येथेच केलेल्या अन्य एका कारवाईत एका राहत्या घरातून 16 जार 800 रूपयांचा 43.20 लीटर देशी दारू जप्त केली आहे. निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर अवैध दारूविक्री रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेदरम्यान विविध गुन्हयांमध्ये तक्कल 1340.4 लिटर देशी, 150.52 लिटर विदेशी, 91.07 लिटर बिअर, 148 लि. ताडी, 26914 लि.सडावा, 1676 लि. हातभट्टीची दारू पकडण्यात आली आहे.