शरद पवारांनी शेतकर्‍यांची माफी मागावी

गृहमंत्री अमित शहा यांची घणाघाती टिका

    दिनांक :24-Apr-2024
Total Views |
अमरावतीत महायुतीची विराट जाहीर सभा
तभा वृत्तेसवा
अमरावती, 
Amit Shah नवनीत राणा यांना विजयी करण्याचे जे आवाहन गेल्या निवडणुकीत मी केले होते, ती माझी मोठी चूक होती. त्याबद्दल मला माफ करा, असे जेष्ठ नेते शरद पवार अमरावतीत म्हणाल्याचे मला कळले. त्यांचा हा युक्तीवाद बेगडी असून त्यांनी दहा वर्ष कृषीमंत्री राहून शेतकर्‍यांसाठी काय केले. उलट त्यांनीच शेतकर्‍यांची माफी मागायला हवी होती. त्यांच्या इतका अपयशी कृषीमंत्री आजपर्यंत झाला नाही, अशी घणाघाती टिका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली.
 

Amit shah 
 
अमरावती लोकसभेच्या महायुतीच्या भाजपा उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी बुधवारी दुपारी सायन्सकोर मैदानावर विराट सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. अमित शहा यांचे स्वागत चांदीची गदा देऊन करण्यात आले. व्यापपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चैनसुख संचेती, खा. अनिल बोंडे, आ. प्रवीण पोटे, उमेदवार खा. नवनीत राणा, आ. रवि राणा, आ. प्रताप अडसड, अभिजीत अडसूळ यांच्यासह अन्य मंडळी हजर होती. शहा पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश विकसित होत आहे. मोदीजींच्या विकासाच्या इंजिनला अमरावतीतून डबा जोडण्यासाठी एक नंबरचे बटन दाबून नवनीत यांना विजयी करा. काँग्रेस देशात अफवा फैलत आहे की, भाजपा 400 पारचा नारा देऊन संविधान बदलणार आहे व आरक्षण संपवणार आहे. मी देशातील जनतेला अस्वस्थ करू इच्छितो की, आम्हाला ते काहीच करायचे नसून देशहीतासाठी आणखी चांगले निर्णय घ्यायचे आहे. काश्मिरचे कलम 370 व तीन तलका ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. उद्धव ठाकरे नकली शिवसेनेचे अध्यक्ष आहे. ते जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी उमेश कोल्हे हत्याकांड दडपण्याचा प्रयत्न केला होता, याची आठवण अमित शहा यांनी अमरावतीकरांना करून दिली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मविआने सत्तेचे स्वप्न पाहू नये.Amit Shah पंतप्रधान म्हणून देशातल्या जनतेला मोदीच पाहिजे आहेत. मोदींचे हात बळकट करण्यासाठी अमरावतीकरांनी नवनीत यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सत्तेत असताना विदर्भावर अन्याय केला म्हणून शरद पवारांनी माफी मागायला हवी. आम्ही जेव्हा सत्तेत आलो तेव्हा पासून अमरावतीसह विदर्भाचा विकास खर्‍या अर्थाने सुरू झाला. अरावतीत टेक्सटाईल पार्क, वैद्यकीय महाविद्याल, विमानतळ, मराठी भाषा विद्यापीठ असे अनेक विकासाचे निर्णय घेतले आहे. नवनीत या वाघिण आहेत. ठाकरे सरकारने त्यांना त्रास दिला तरी त्या घाबरल्या नाही. त्यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. तत्पूर्वी अन्य काही नेत्यांची भाषणे झाली. सभेला मोठ्यासंख्येने नागरिकांची गर्दी होती.