अस्वस्थतेनंतर गडकरी पुन्हा भिडले प्रचाराला!

    दिनांक :24-Apr-2024
Total Views |
यवतमाळ,
nitin Gadkari fainted यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ पुसद इथं सुरू असलेल्या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. कार्यकर्त्यांनी त्यांना सावरत मंचावरून उचलून नेलं आणि ताबडतोब त्यांच्यावर प्राथमिक उपचार केला, दरम्यान काही वेळाने नितीन गडकरी यांनी पुन्हा आपल्या भाषणाला सुरुवात केली. आपल्या भााषणात गडकरी यांनी देशात विकासाचे पर्व सुरू असून या पर्वात तुमच्या प्रत्येकाचं मत महत्वाचं असल्याचं सांगितलं. तसंच महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना भरभरुन मतदान करण्याचं आवाहनही गडकरी यांनी केलं. पीएम मोदी यांच्या काळातील रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाच्या कामाचा आढावाही त्यांनी या सभेत घेतला. विरोधकांकडे प्रचासासाठी मुद्देच नसल्याचा टोलाही यावेळी गडकरी यांनी लगावला.  बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील 'या' जागांवर "कांटे कि टक्कर"...
 
 
vbfyt7
यवतमाळ शहरातील २४८ मतदान केंद्र झाले सुसज्ज  दरम्यान हेलिकॉप्टरचा एसी बंद असल्याचे समोर आले आहे. तसेच मंचावरही मोकळी हवा नसल्याने त्यांना अस्वस्थ वाटत होते असे सांगण्यात येत आहे. nitin Gadkari fainted दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 8 मतदारसंघात शुक्रवारी मतदान होणार आहे. या मतदारासंघात बुधवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता.त्यामुळे सर्व पक्षांनी प्रचारासाठी जोर लावला. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.    निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांसाठी आता पुन्हा तीन दिवस मतदान