हरियाणातील उत्खननात सापडल्या 400 वर्षे जुन्या मूर्ती

    दिनांक :25-Apr-2024
Total Views |
मानेसर,
400 year old idols found हरियाणातील मानेसरजवळील बागनकी गावात उत्खननादरम्यान अनेक वर्षे जुन्या मूर्ती सापडल्या आहेत. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, बुधवारी पोलिसांनी सांगितले की घराच्या बांधकाम प्रकल्पासाठी उत्खनन सुरू होते, त्याच वेळी तीन धातूच्या मूर्ती सापडल्या, ज्या सुमारे 400 वर्षे जुन्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरातन मूर्ती ताब्यात घेण्यात आल्या असून मालकाला बांधकाम थांबवण्यास सांगण्यात आले आहे. या ठिकाणी आणखी शिल्पे आहेत की नाही हे पाहण्यासाठी पुरातत्व विभाग आता आणखी उत्खनन करणार आहे.  भर रस्त्यात कुत्र्याने दोन मुलांवर केला हल्ला...धक्कादायक video
 
bnfjffy
 
आईने मुलांचा हात धरून यमुना नदीत घेतली उडी!  नवीन घराचा पाया जेसीबी मशिनने खोदला जात असताना या मूर्ती सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. सुरुवातीला प्लॉट मालकाने प्रकरण लपविण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी जेसीबी चालकाला पैसेही देऊ केले. मात्र, चालकाने दोन दिवसांनी बिलासपूर पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. 400 year old idols found ते म्हणाले की, प्लॉट मालकाच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या मूर्तींमध्ये भगवान विष्णूची मूर्ती, लक्ष्मीची मूर्ती आणि लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या संयुक्त मूर्तीचा समावेश आहे. बिलासपूर पोलिसांनी या मूर्ती पुरातत्व विभागाचे उपसंचालक बनानी भट्टाचार्य आणि डॉ. कुश ढेबर यांच्याकडे सुपूर्द केल्या आहेत.  फॉर्म्युला दूध देणे योग्य की अयोग्य ?जाणून घ्या
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावकऱ्यांनी त्या ठिकाणी मंदिर बांधायचे असल्याने मूर्ती पंचायतीच्या ताब्यात द्याव्यात, असे सांगितले. 400 year old idols found मात्र, पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची मागणी फेटाळून लावली आहे. पुरातत्व विभागाचे उपसंचालक म्हणाले की, या मूर्ती सरकारची मालमत्ता असून त्यावर कोणाचाही वैयक्तिक अधिकार असू शकत नाही. आमच्या प्रयोगशाळेत अभ्यास केल्यानंतर ते पुरातत्व विभागाच्या संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत. प्राथमिक तपासणीनुसार ही शिल्पे सुमारे 400 वर्षे जुनी असल्याचे दिसून येते.