अरुणाचलमध्ये भूस्खलन...संपर्क तुटला

    दिनांक :25-Apr-2024
Total Views |
नवी दिल्ली,
Landslides in Arunachal अरुणाचल प्रदेशातील अनेक भागात मुसळधार भूस्खलनाचे वृत्त आहे. त्यामुळे दिबांग खोऱ्यातील भागांसह चीनच्या सीमेला लागून असलेल्या भागांशी संपर्क तुटला आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.
 
bhuskhalan
(NHIDCL) ने महामार्गाच्या खराब झालेल्या भागांच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे परंतु सततच्या पावसामुळे दुरुस्तीच्या कामात अनेक अडचणी येत आहेत. राष्ट्रीय महामार्ग NH-33 स्थानिक लोकांसाठी तसेच सैन्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. Landslides in Arunachal प्रचंड भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने या भागात येणाऱ्या लोकांसाठी प्रवासी सल्लाही जारी केला आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार परिस्थिती सामान्य होण्यासाठी किमान तीन दिवस लागतील.