आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भाजप आणि काँग्रेसला नोटीस

निवडणूक आयोगाने 29 एप्रिलपर्यंत उत्तर मागवले...

    दिनांक :25-Apr-2024
Total Views |
नवी दिल्ली,
Lok Sabha Elections 2024 : निवडणूक आयोगाने मोठी कारवाई करत भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. आचारसंहितेच्या कथित उल्लंघनाची दखल घेत निवडणूक आयोगाने ही नोटीस जारी केली आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी धर्म, जात, समुदाय किंवा भाषेच्या आधारावर द्वेष आणि फूट निर्माण केल्याचा आरोप केला होता. VIDEO: राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भाषेतील शिष्टाचार विसरले!
 
BJP AND CONG
 
 
 
लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 77 अंतर्गत नोटीस
 

हेही बघा: काँग्रेसचा वचननामा देशाला संपवण्याकरीता !  निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ७७ चा वापर करून ही नोटीस जारी केली आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राहुल गांधींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती, तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींविरोधात आयोगाकडे तक्रार केली होती. दोन्ही तक्रारींची दखल घेत निवडणूक आयोगाने ही नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही नेत्यांकडून 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तरे मागवली आहेत.  चांद्रयान संदर्भात आले मोठे अपडेट
 
उच्च पदावरील लोकांच्या भाषणांचे अधिक गंभीर परिणाम
 
आयोगाचे म्हणणे आहे की राजकीय पक्षांना त्यांच्या उमेदवारांच्या, विशेषतः स्टार प्रचारकांच्या वर्तनाची प्राथमिक आणि वाढती जबाबदारी घ्यावी लागेल. उच्च पदावरील लोकांच्या प्रचार भाषणांचे अधिक गंभीर परिणाम होतात.
 
असे पीएम मोदींनी राजस्थानमधील सभेत सांगितले होते
 
खरे तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच राजस्थानमधील एका निवडणूक रॅलीत म्हटले होते की, काँग्रेस सत्तेवर आल्यास लोकांच्या मालमत्तेचे वाटप घुसखोर आणि जास्त मुले असलेल्यांमध्ये करेल. त्यादरम्यान त्यांनी देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वक्तव्याचाही उल्लेख केला होता. देशाच्या साधनसंपत्तीवर अल्पसंख्याक समाजाचा पहिला हक्क असल्याचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले होते.
 
काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भाषणामुळे काँग्रेस नाराज झाली आणि त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. काँग्रेसने पंतप्रधान मोदींचे वक्तव्य फुटीर आणि द्वेषपूर्ण असल्याचे वर्णन करून हे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसच्या या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने आता भाजपला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे.