मेहकर मतदार संघात 3 नवरदेवांनी केले मतदान

    दिनांक :26-Apr-2024
Total Views |
मेहकर
Mehkar Constituency : आधी लगीन लोकशाहीचे नंतर आमचे असे म्हणत बोहल्यावर चढ़ण्यापूर्वी मेहकर मतदार संघातील विविध बूथवर 3 नवरदेवांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.  बुलढाणा प्रशासकीय इमारत मतदान केंद्रावर गोधळ(Video)
 
 

fsal
 
या बाबत अधिक माहिती नुसार आज 26 एप्रिल रोजी बुलढाणा लोकसभेसाठी मतदान होत असून लग्नाची तिथ दाट असून आज खुप लग्न आहेत ज्यांच आज लग्न आहे. अश्या नवरदेवांनी बोहल्यावर चढ़ण्याअगोदर आपल्या मतदानाचा हक्क बजावून अगोदर लोकशाहीचे लग्न लाऊन नंतर ते स्वतःचे लग्न लावनार आहेत. मेहकर तालुक्यातील उकळी येथील गणेश भागवत सोनुने या नवरदेवाने आपला मतदानाचा हक्क बजावला व नंतर ते रवाना झाले. त्यानंतर उकळी येथीलच शुभम केदारनाथ पातळे या नवरदेवानेही लग्न लावण्यासाठी रवाना होण्याअगोदर आपले कर्त्यव्य बजावत मतदान केले तसेच लोणार तालुक्यातील किन्ही येथील नवरदेव वैभव प्रकाश कायंदे याने ही लग्नाअगोदर आपला हक्क बजावत मतदान केले.