महिलेच्या नांवावर अन्य कोणी केले मतदान!

    दिनांक :26-Apr-2024
Total Views |
हिंगणघाट 
voting स्थानिक तुकडोजी वार्ड येथील कमला नेहरू प्राथमिक विद्यालयातील मतदान केंद्र २६१/अ या मतदान केंद्रावर एका महिला मतदाराचे नावावरती अन्य कुणी मतदान केल्याची घटना समोर आल्याने काही काळ गोंधळ उडाला.
 

voting 
 
येथील यादीतील मतदार मीना विजय पांगुळ यांचे नांवे अन्य कुण्या व्यक्तीने फेक मतदान केले गेले, अखेर उपस्थित केंद्राध्यक्ष यांनी वरिष्ठांशी संपर्क साधून या महिला मतदारास टेंडर मतदान करण्याची परवानगी दिली. प्राप्त माहिती नुसार आज दुपारी सदर महिला मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर गेली, यावेळी अन्य कुण्या व्यक्तीने त्यांचे नावे मतदान केल्याची बाब उघडकीस आली.voting त्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष यांनी नजरचुकीने मतदान झाल्याचे मान्य करून सदर मतदाराला टेंडर मत देण्याची अनुमती दिली. याप्रकाराने या केंद्रावर काही काळ गोंधळ उडाला होता.