असा राहिला विद्यार्थी नेते सोनोवाल यांचा प्रवास

    दिनांक :04-Apr-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली,
Lok Sabha Election 2024 : केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल महाविद्यालयीन जीवनात आसाममधील घुसखोरांविरुद्धच्या आंदोलनात आघाडीवर होते. आसाममधील विद्याथ्र्यांचे आंदोलन एकेकाळी भारतातच नाही तर जगात गाजले होते. आसाममधील घुसखोरीच्या मुद्यावर आसू आणि केंद्र सरकारमध्ये समझोत झाला. आसूच्या नेत्यांनी १९८५ मध्ये आसाम गण परिषद या राजकीय पक्षाची स्थापना केली. त्याचवर्षी झालेली आसाम विधानसभेची निवडणूक आसाम गण परिषदेने qजकली आणि देशातील सर्वांत लहान वयाचे प्रफुल्लकुमार महंत मुख्यमंत्री झाले. नंतर काळाच्या ओघात आसाम गण परिषदेत फूट पडली, आगपचाही फारसा प्रभाव आसाममध्ये उरला नाही.  जेवल्यानंतर वेलची का खावी ?तुम्हाला फायदे माहित आहेत का ?
 
 
lok sabha
 
 
 
सोनोवाल ऑल आसाम स्टडुंटमध्ये (आसू) सक्रिय होते. नॉर्थ ईस्ट स्टुडंट युनियनचे (नेसू) अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. आसू ही राज्यातील प्रभावी अशी विद्यार्थी संघटना होती. १९९२ ते १९९९ पर्यंत सोनोवाल आसूचे अध्यक्ष होते. २००१ मध्ये सोनोवाल आगपतर्फे पहिल्यांदा आसाम विधानसभेवर निवडून आले. आमदार असतानाच २००४ मध्ये त्यांनी आगपतर्फे दिब्रुगड मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली.   आपचा उद्दामपणा...डॉ.आंबेडकरांच्या शेजारी केजरीवालांना जागा !
 
 
आगपमध्ये आपल्याला राजकीय भविष्य नाही, हे लक्षात आल्यानंतर सोनोवाल यांनी २०११ मध्ये भाजपाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. सोनोवाल यांच्या रूपात आसाममध्ये भाजपाला दमदार आणि कर्तबगार नेतृत्व मिळाले. भाजपात आल्यानंतर सोनोवाल यांचे नेतृत्व आणि कर्तृत्व बहरले. आसाम प्रदेश भाजपाचे अध्यक्षपद त्यांनी दोनदा भूषवले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जिंक्ल्यानांतर मोदी मंत्रिमंडळात त्याचा समावेश झाला. सामान्यपणे भाजपात बाहेरून आलेल्या नेत्याला मुख्यमंत्रिपद मिळत नाही, पण २०१६ मध्ये राज्यात भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर सोनोवाल यांना मुख्यमंत्री करण्यात आले. त्यांची मुख्यमंत्रिपदाची पाच वर्षांची कामगिरी अतिशय प्रभावी आणि आश्वासक अशी राहिली. राज्याला त्यांनी विकासाच्या वाटेवर नेले. ईशान्य भारतातील राज्यात आसाममध्ये भाजपाचे सरकार आणण्यात सोनोवाल यांचे मोठे योगदान होते.