राज्यपाल पुरस्कारासाठी ‘प्रोग्रेसिव्ह’च्या 21 विद्यार्थ्यांची निवड

    दिनांक :05-Apr-2024
Total Views |
गोंदिया,
Governor's Award : येथील उमादेवी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे संचालित प्रोग्रेसिव्ह इंग्रजी व हिंदी विद्यालयाच्या 21 स्काऊट, गाईड विद्यार्थ्यांची राज्यपाल पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
 
 
Hasd
 
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट व गाईड मुंबईद्वारे आयोजित राज्यपाल पुरस्कार प्रक्रियेत प्रोग्रेसिव्ह विद्यालयाच्या स्काऊट व गाईड्सनी उत्कृष्ट प्रदर्शन केल्याने त्यांची राज्यपाल पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यात प्रोग्रेसिव्ह इंग्रजी विद्यालयाचा स्काऊट रितीक गावडकर, ॠषभ कुरसुंगे, प्रविण जमदार, ॠषीकेश इळपाते, सौरभ मडावी, जीत गायधने, शशांक चौरे तसेच प्रोग्रेसिव्ह हिंदी विद्यालयाची गाईड त्रिवेणी किचे, अपसा शेख, रागिनी क्षीरसागर, रुपाली इळपाचे, वैष्णवी इळपाचे, श्रेया लोंदासे, पायल कलाम आणि स्काऊट दीप सावरकर, विकास राठोड, प्रज्वल कोचे, खुशाल ब्राम्हणकर, धीरज सेलोकर, सोहम शेंडे, समीर शेंडे यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड शिक्षक ज्योती पहिरे, सरीता मेंढे, ओमेश्‍वर तांडेकर, सुखचंद उईके, कमलेश पटले यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थी व मार्गदर्शकांचे संस्थाध्यक्ष डॉ. पंकज कटकवार, सचिव डॉ. निरज कटकवार, प्राचार्य ओ. टी. रहांगडाले, कुमुदिनी तावाडे, स्काऊटचे मुख्य प्रशिक्षक विठोबा भगत, स्काऊटचे जिल्हा सहायक आयुक्त बी. एच. जीवानी, मदनगोपाल नंदनवार, मंजुषी देशपांडे, स्काऊटचे जिल्हा संघटक पराग खुजे, चेतना ब्राम्हणकर, वसंत हिवीरघरे, नरेंद्र कोचे, दिप्ती डोहारे, सुलभा डोहारे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले.