विश्वगुरू मोदींचे नेतृत्व आवश्यक - विश्वास पाठक

पत्रपरिषदेत दिली माहिती

    दिनांक :05-Apr-2024
Total Views |
गोंदिया, 
PM MODI पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दशकभराच्या कार्यकाळात देशाला प्रगती पथावर नेले. 11 व्या स्थानी असलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेने आज 5 व्या स्थानी झेप घेतली आहे. येत्या काळात खूप कामे करायची आहेत, देशाला विश्वगुरू बनविणे आहे आणि म्हणून पुन्हा देशाला नरेंद्र मोदींचे नेतृत्व आवश्यक आहे. असे मत भाजपचे प्रदेश प्रवक्ता विश्वास पाठक यांनी व्यक्त केले. ते आज 5 एप्रिल रोजी शहरातील हाटेल ग्रँडसीता येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गोंदिया येथे होणार्‍या सभे संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
 
FDRERE
 
PM MODI पुढे पाठक म्हणाले, विद्यमान खा. सुनिल मेंढे यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे. त्यांच्या गत पाच वर्षाच्या कार्यकाळात भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात रस्त्यांचे जाळे विणले गेले. लाखो लोकांना घरकुलाचा लाभ मिळाला, प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी हर घर नळ योजना कार्यान्वित केली. प्रत्येक कुटुंब, नागरिक समृद्ध होण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना केंद्र सरकारने सुरू केल्या. आज त्यांचा लाभ लाखो कुटुंबांना मिळतो आहे. देशात भाजपाचे सर्वाधिक 370 तर एनडीएचे 400 पेक्षा जास्त खासदार निवडून येतील. 2019 च्या निवडणुकीत मेंढे यांच्या मतांची टक्केवारी 52 होती यावेळी 60 टक्के राहील. असा विश्वास देखील पाठक यांनी यावेळी व्यक्त केला. 19 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीतर्फे सुनिल मेंढे उमेदवार असून त्यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा गोंदियात नियोजित असल्याचे पाठक म्हणाले. पत्रपरिषदेला लोकसभा निवडणुक प्रभारी व माजी मंत्री परिणय फुके, जिप अध्यक्ष पंकज रहांगडाले, भाजपा जिल्हाध्यक्ष येशुुलाल उपराडे, माजी आमदार रमेश कुथे, माजी आ. राजेंद्र जैन, माजी जिप अध्यक्ष नेतराम कटरे, माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे, भाजपचे गोंदिया भंडारा संपर्क प्रमुख विरेंद्र अंजनकर, दिनेश दादरिवाल, सुनिल केलनका, जयंत शुक्ला आदी उपस्थित होते.