खळखळणारी, स्वच्छ नागनदी...तुम्ही पाहीलीत का?

Clean Nag River-NMC दोनशे कोटींच्या निधीतून काम सुरू

    दिनांक :11-May-2024
Total Views |
 रेवती जोशी-अंधारे 
 
नागपूर,
 
 
Clean Nag River-NMC वळणदार प्रवाहाची नदी, तिच्या दोन्ही काठांवर वसलेली प्राचीन मंदीरं, गर्द वनराई आणि एक टुमदार शहर ! या नदीच्या स्वच्छ आणि खळाळत्या पाण्यातून, जलविहार करण्याचं, मालवाहतूक करण्याचं आणि सायंकाळी निवांत वेळ घालविता येतील असे देखणे किनारे...Clean Nag River-NMC नागपूरच्या लोकप्रिय खासदाराने हे स्वप्न नागपूरकरांना दाखविलं होतं. आता हे स्वप्न पूर्णत्वाला जाण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे.Clean Nag River-NMC
 
 

Clean Nag River-NMC 
 (छाया : अनंत मुळे)
 
 
साप्ताहिक राशिभविष्य   काळं, घाणेरडं, वास येणारं पाणी, जागोजागी जमलेला कचरा आणि तुंबलेलं पाणी ! नागनदीचं हे चित्र तुमच्या मनात ठसलं असेल तर आता ते बदलविण्याची वेळ आली आहे. Clean Nag River-NMC आता अंबाझरी घाटाजवळ नदीचं हे खळाळतं रूप बघायला मिळतंय. नागपूरच्या नाग, पिवळी आणि पोहरा नदी स्वच्छतेसह, घाट रोडवरील नाग नदी रुंदीकरणाचे काम सुरू झाल्यामुळे नागपूरकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या नदी स्वच्छता अभियानामध्ये नाग नदीच्या अंबाझरी दहन घाट परिसरातील पात्राचे रुंदीकरण देखील केलं जात आहे. Clean Nag River-NMC गेल्या वर्षीच्या मुसळधार पावसाने रौद्ररूप घेणाऱ्या नागनदीने सगळ्यांना घाबरवलं होतं. त्या पुरात गाड्या वाहून जाण्यासह इतर अनेक समस्या नागरिकांसमोर उभ्या ठाकल्या.  पीओकेमध्ये युद्धासारखी परिस्थिती, सैन्याच्या चकमकीत अधिकारी ठार
 
 
हा अनुभव लक्षात घेता, यंदा नाग नदी स्वच्छता तसेच पात्राचं रुंदीकरण कार्य मान्सूनपूर्वी पूर्ण व्हावं, यादृष्टी गती वाढविण्याचे निर्देश मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत. डॉ.चौधरी यांनी नाग नदी स्वच्छता तसेच अंबाझरी दहन घाटाजवळील पात्राच्या रुंदीकरण कामाची पाहणी केली आणि आढावा घेतला. Clean Nag River-NMC नाग नदीच्या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊ नये आणि खूप जास्त पावसातही पाणी सुरळीत वाहून जावे, यासाठी अंबाझरी दहन घाट ते व्हीएनआयटी पूलापर्यंतचं पात्र रुंद करण्याची सूचना सिंचन विभागाद्वारे करण्यात आली होती.
 
 
त्यानुसार, अत्याधुनिक उपकरणांचा वापर करून वेगाने कामाला सुरुवात झाली आहे. Clean Nag River-NMC नदी स्वच्छता अभियानाला सहकार्य करण्यासाठी, नदीपात्रात कचरा टाकणे टाळावे, प्रक्रीया करूनच सांडपाणी सोडले जाईल, याची काळजी घ्यावी, पशूधन नदीपात्रात सोडू नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात आलं आहे. सर्वांच्या सहकार्यातूनच स्वच्छ नागनदीचं स्वप्न साकार होऊ शकणार आहे. आता कामाला जेमतेम सुरुवात झाली असताना नदीचं पात्र इतकं स्वच्छ दिसत असताना, नितळ निळाईचं पाणी नदीपात्रात दिसेल, यात काहीच शंका नाही.