ओटावा,
Nijjar murder case खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी चौथ्या संशयित भारतीय नागरिकांना अटक केली. एका अधिकृत पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. कॅनडातील ब्रॅम्प्टन, सरे आणि ॲबॉट्सफोर्ड येथे राहणारा अमरदीप सिंग (22) याच्यावर फर्स्ट डिग्री हत्या आणि हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
केकेआर ठरली प्लेऑफमध्ये पोहोचणारी पहिली टीम

इंटिग्रेटेड होमिसाईड इन्व्हेस्टिगेशन टीम (आयएचआयटी) ने सांगितले की अमरदीप सिंगला निज्जरच्या हत्येतील भूमिकेसाठी 11 मे रोजी अटक करण्यात आली होती. बंदुक बाळगल्याच्या आरोपावरून अमरदीप आधीच पील प्रादेशिक पोलिसांच्या ताब्यात होता, अधिकृत प्रकाशनात म्हटले आहे. आयएचआयटीचे प्रभारी अधिकारी मनदीप मुकर म्हणाले, "ही अटक निज्जरच्या हत्येमध्ये ज्यांनी भूमिका बजावली त्यांना जबाबदार धरण्यासाठी आमच्या चालू तपासाचे स्वरूप प्रतिबिंबित करते." निज्जर (वय 48 वर्ष) यांच 18 जून 2023 रोजी सरे, ब्रिटिश कोलंबिया येथील गुरु नानक शीख गुरुद्वाराबाहेर हत्या करण्यात आली होती. Nijjar murder case यापूर्वी आयएचआयटीच्या तपासकर्त्यांनी निज्जरच्या हत्येप्रकरणी करण ब्रार (22), कमलप्रीत सिंग (22) आणि करणप्रीत सिंग (28) या तीन भारतीयांना 3 मे रोजी अटक केली होती. एडमंडनमध्ये राहणारे हे तिघेही भारतीय नागरिक असून त्यांच्यावर फर्स्ट डिग्री खून आणि हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.