मुंबई,
Anushka gets emotional after RCB win आईपीएल 2024 च्या 62 व्या सामन्यात रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने दिल्ली कॅपिटल्सचा 47 धावांनी पराभव केला. या विजयासह आरसीबीने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करत 187/9 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स 140 धावांत गडगडली.
माधवी लता म्हणाल्या...बुरखा उतरवणे माझा अधिकार! video 
स्वाती मालीवाल म्हणाल्या...मला केजरीवालांच्या पीएने मारले आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहली आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची प्रतिक्रिया व्हायरल झाली. विजयानंतर अनुष्का शर्माच्या चेहऱ्यावर दिलासा दिसत होता तर कोहली उत्साहाने भरलेला दिसत होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चालू मोसमात सलग पाचवा विजय नोंदवला.
Anushka gets emotional after RCB win आरसीबीचे आता 13 सामन्यांतून 12 गुण झाले असून गुणतालिकेत ते पाचव्या स्थानावर पोहोचले आहे. आरसीबीला गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 18 मे रोजी शेवटचा साखळी सामना खेळायचा आहे. आरसीबी कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल.
गावस्करांची शक्कल...तर कोणीही आयपीएल अर्धवट सोडू जाणार नाही 
बारावी पाठोपाठ दहावीचाही निकाल जाहीर चालू हंगामात आरसीबीसाठी इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. जर आपण आयपीएलमधील आरसीबीचा इतिहास तपासला तर आपल्याला कळेल की 2016 मध्ये त्याने शेवटचे सलग पाच सामने जिंकले होते. त्यानंतर आरसीबी संघ अंतिम फेरीत पोहोचला आणि उपविजेता राहिला. यावेळीही आरसीबीने सलग पाच सामने जिंकले असून प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे दरवाजे बंद झालेले नाहीत. आरसीबी प्लेऑफसाठी पात्र ठरणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.