थेट फायनलमध्ये जाणार कोलकाता नाईट रायडर्स!

    दिनांक :20-May-2024
Total Views |
नवी दिल्ली,
Kolkata Knight Riders आयपीएल 2024 आता लीग टप्प्यानंतर प्लेऑफच्या रोमांचक टप्प्यात पोहोचले आहे. प्लेऑफ अंतर्गत पहिला क्वालिफायर सामना मंगळवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. हा सामना 21 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. केकेआरने IPL 2024 च्या गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवून प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आहे, तर हैदराबाद दुसऱ्या स्थानावर राहून पात्र ठरले आहे. पण, केकेआर संघ आता एकही सामना न खेळता फायनलमध्ये पोहोचू शकतो हे तुम्हाला माहीत आहे का? चला पण सांगू कसे? आयपीएल 2024 आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे आणि शेवटचे काही सामने पावसामुळे वाहून गेले आहेत. आता पावसामुळे प्लेऑफच्या सामन्यातही व्यत्यय येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.   हेही वाचा : काय आहे लिक्विड नायट्रोजन पान! ज्यामुळे पोटात पडले छिद्र!
 
 
kkr
 
हेही वाचा : धक्कादायक ! कानपुरात ४ वेगवेळ्या ठिकाणी अपघात...३ कारचालकांचा जागीच मृत्यू  मंगळवार, 21 मे रोजी अहमदाबादमध्ये कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात आयपीएल क्वालिफायर-1 सामना होणार आहे. जिथे मागील दोन सामने पावसाने गमावले आहेत. Kolkata Knight Riders हा सामनाही वाहून गेला तर आरसीबी न खेळता अंतिम फेरीत पोहोचेल. वास्तविक, कोणत्याही प्लेऑफ सामन्यासाठी राखीव दिवस नसतो. क्वालिफायर-1 मध्ये पाऊस पडल्यास, प्रत्येकी किमान 5 षटकांचा सामना आयोजित करण्यासाठी किंवा सुपर ओव्हरद्वारे निकाल मिळविण्यासाठी 2 तासांचा अतिरिक्त वेळ दिला जाईल. तरीही निकाल न लागल्यास गुणतालिकेत वरच्या क्रमांकावर असलेल्या संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल. अशा स्थितीत केकेआर थेट फायनलमध्ये पोहोचेल. तर सनरायझर्स हैदराबादला एलिमिनेटरच्या विजेत्याविरुद्ध दुसरा क्वालिफायर खेळावा लागेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमबद्दल बोलायचे झाले तर, येथील शेवटचे दोन सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. 13 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना नाणेफेक न होता पावसामुळे वाहून गेला. यानंतर 16 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्सचा सामनाही पावसामुळे नाणेफेक न होता रद्द करण्यात आला.