जळगाव,
Jalgaon-heatwave-death महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान सध्या विदर्भ व खान्देशात नोंदविण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात पारा ४७ अंश सेल्सियसवर गेला. यंदा मान्सून लवकर येणार असला तरी तोपर्यंत उन्हाचा चटका सोसावा लागणार आहे. Jalgaon-heatwave-death वाढत्या उष्णतेचा फटका मुक्या प्राण्यांनाही बसतो आहे. Jalgaon-heatwave-death उन्हाच्या तडाख्यात सापडलेल्या मुक्या पशुधनास जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताई नगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा गावात मेंढपाळ कुटुंबीयांच्या शंभरावर मेंढ्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. Jalgaon-heatwave-death जळगावमधील मेंढ्या दगावल्याच्या घटनेनंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच, नुकसानग्रस्त मेंढपाळ कुटुंबीयांना मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केले. स्थानिक पशू चिकित्सकांनी मृत शेळ्यांचे शवविच्छेदन करून, त्या उष्माघातामुळेच मरण पावल्याचे निदान झाले आहे.
Jalgaon-heatwave-death दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात भवानी माथाजवळ जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर गव्हाच्या पोत्यांच्या ट्रकला आग लागली. दरम्यान, अग्निशमच्या गाड्या पोहचेपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या खळबळजनक घटनेची सध्या जिल्ह्यात चर्चा असून उन्हामुळे नागरिकही घराबाहेर पडत नाहीयेत. Jalgaon-heatwave-death दरम्यान, उष्माघातामुळे मृत्यू झाल्याच्याही घटना घडल्या आहेत.