हैदराबाद,
Ban on tobacco, pan masala तेलंगणाच्या रेवंत रेड्डी सरकारने राज्यात तंबाखू आणि निकोटीन असलेल्या गुटखा आणि पान मसाला उत्पादन आणि विक्रीवर बंदी घातली आहे. सरकारने एका आदेशात म्हटले आहे की, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, साठवणूक आणि वितरणावर एक वर्षासाठी बंदी असेल. हे निर्बंध 24 मे 2024 पासून लागू होणार आहेत. सार्वजनिक आरोग्य लक्षात घेऊन हा आदेश काढण्यात आल्याचे तेलंगणा सरकारने म्हटले आहे. राज्याच्या अन्न सुरक्षा आयुक्तांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे.
अधिसूचनेत म्हटले आहे की, सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी, तेलंगणा सरकारने गुटखा आणि पान मसाला उत्पादन, साठवण, वितरण, वाहतूक आणि विक्रीवर बंदी घातली आहे. Ban on tobacco, pan masala ही बंदी 24 मे 2024 पासून संपूर्ण तेलंगणात एक वर्षासाठी लागू राहील. गुटखा आणि पान मसाला खाल्ल्याने तोंडाचा कर्करोग, सबम्यूकस फायब्रोसिस आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढतो.