गोपालन हवे...!

Savarkar thoughts on Cow स्वराष्ट्रहत्या सहस्रपटीने मोठे पाप

    दिनांक :27-May-2024
Total Views |
वेध
 
- अनिरुद्ध पांडे 
 
Savarkar thoughts on Cow भारताच्या इतिहासातील एक चतुरस्र व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे निर्विवादच. ‘झाले बहु होतील बहु परंतु यासम हा...' या वचनाचे प्रत्यक्ष रूप म्हणजे सावरकर. या उत्तुंग महापुरुषाला वादग्रस्त ठरवण्याची प्रकृती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. Savarkar thoughts on Cow या पृष्ठभूमीवर उद्याच्या त्यांच्या जयंतीदिनी त्यांचे स्मरण अधिकाधिक आवर्जून करणे या दिवसांमध्ये अत्यावश्यक झाले आहे. आपल्या परमप्रिय मातृभूमीवरील अविचल श्रद्धेपोटी त्यांनी वैराण वाळवंटातून अखंड प्रवास केला. त्यांचे दिव्य दारुण व्रत अढळपणे सुरू असताना, भारतीय समाज संघटित करून एकत्र आणि ताठपणे उभा करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. Savarkar thoughts on Cow धारदार लेखणी आणि अमोघ वाणी ही त्यांची साधने होती. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भारतीय समाज पेटून उठावा, असे त्यांना वाटत होते. स्वातंत्र्याबरोबर समाजाचे सर्वांगीण परिवर्तन व्हावे, असे त्यांना मनोमन वाटत असे. Savarkar thoughts on Cow त्यांचे निबंध, बातमीपत्रे आणि भाषणे या तीन साधनांचा ते लोकजागृतीसाठी पुरेपूर वापर करून घेत असत.
 
 
 
 
Savarkar thoughts on Cow
 
 
 
सावरकरांच्या राष्ट्रवादी विचारांत राष्ट्रीय स्वातंत्र्य ही एक, तर समाजाचा सर्वांगीण उत्कर्ष ही दुसरी बाजू होती. त्यांची आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानावर अपरिमित श्रद्धा होती. अद्ययावतता हा त्यांच्या विज्ञान विचारांचा मूलमंत्र होता. भारतीय मुसलमान विज्ञाननिष्ठ झाले तर त्यांच्यातील धर्मवेड कमी होईल आणि त्यातून त्यांचे व हिंदूंचेही भले होईल, असे त्यांना मनोमन वाटत असे. Savarkar thoughts on Cow हिंदूंनी आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान अवगत करावे आणि आपला उत्कर्ष साधावा, अशीही त्यांची भूमिका होती. महात्मा गांधींनीही सावरकर हे धाडसी, चतुर व बुद्धिमान देशभक्त आहेत. ते क्रांतिकारक आहेत आणि ही गोष्ट त्यांनी लपवून ठेवलेली नाही, अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले आहे. तर्काच्या कसोटीवर न बसणाऱ्या हिंदू जीवन पद्धतीतील दुष्ट स्वरूपाच्या रुढी, परंपरा नि प्रथांवर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कठोर टीका केली. बहुसंख्य हिंदूंच्या श्रद्धेचा विषय असलेल्या गायीबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट होती. थोडक्यात म्हणजे ‘गोपालन हवे, गोपूजन नव्हे' इतके परखड विचार ते मांडत.
 
 
 
‘‘गाय हा पशू हिंदुस्थानसारख्या कृषिप्रधान देशाला अत्यंत उपयुक्त असल्यामुळे अगदी वैदिक काळापासून आपणा हिंदू लोकांचा तो आवडता असावा, हे साहजिकच आहे. Savarkar thoughts on Cow गायीसारखा वत्सल, माणसाळू, बापडा, सुरेख, दुधाळ पशू कोणास आवडणार नाही? आईच्या दुधाखालोखाल गायीचे दूध आपल्या देशात तरी मुलांना निश्चितच मानवते. मृगयाशील युग ओलांडण्याइतका सुधारताच त्या प्राचीन काळापासून गाय ही मनुष्याची युगानुयुगे अत्यंत प्रामाणिक सोबतीण झाली आहे. शेतीच्या खालोखाल गायीच्या दूध, दही, लोणी, तुपावर मनुष्याचा पिंड आजही पोसला जात आहे. त्या ‘अत्युपयुक्त' पशूचे आम्हा मनुष्यास एखाद्या कुटुंबीयाइतके ममत्व वाटावे हे अगदी माणुसकीस धरूनच आहे. अशा या गायीचे रक्षण करणे, पालन करणे, हे आपले वैयक्तिक आणि कौटुंबिकच नव्हे तर आपल्या हिंदुस्थानपुरते तरी एक राष्ट्रीय कर्तव्य आहे,'' असे स्पष्ट प्रतिपादन सावरकरांनी केले आहे.
 
 
 
इतकेच नव्हे, तर जो प्राणी आपणास इतका उपयुक्त आहे त्याविषयी मनात एक प्रकारची कृतज्ञ भावना उपजणे, असणे, हेही आपणा हिंदूंच्या भूतदयाशील स्वभावास अगदी साजेसे आहे, असेही ते म्हणतात. Savarkar thoughts on Cow स्वातंत्र्यवीर सावरकर आणखी म्हणतात, भारतातील हिंदूंना गाय ही उपयुक्त आहे म्हणून प्रिय वाटते, ही गोष्ट निर्विवाद आहे. जे गोभक्त गायीच्या कृतज्ञतेतून देवी म्हणून पूजा करतात तेदेखील, ही पूजा कशी योग्य आहे, हे सांगण्यापूर्वी गाय ही आपणासाठी कशी उपयुक्त आहे, हेच सांगतात. गायीच्या दुधापासून शेणापर्यंत सर्व पदार्थ मनुष्यासाठी किती उपयोगी आहेत, याचाच ते पाढा वाचतात. विज्ञानवादी किंवा बुद्धिप्रामाण्यवादी असल्यामुळे सावरकर त्यांच्या स्वभावाप्रमाणे कधी कधी खूपच स्पष्ट किंवा  कडक विचार मांडतात. ‘गोपालन हवे, गोपूजन नव्हे..' या लेखात ते म्हणतात, ‘मनुष्याला गायीचा अधिकाधिक उपयोग करून घ्यायचा असेल तर देवता समजून गोपूजनाची भावना सर्वस्वी त्याज्य आहे, हे आपणास मानावे लागेल.'
 
 
 
आपला एखादा विचार सर्वसामान्यांना खोलवर समजावून सांगायचा असेल तर त्याच्या अगदी टोकाची भूमिका घेण्याची अनेक मान्यवरांची शैली असते. त्यातूनच सावरकर कदाचित असे टोकाचे विचार मांडत असावेत. त्यातूनच ‘गाय : एक उपयुक्त पशू' एवढेच विधान सावरकरांच्या नावाने संदर्भाशिवाय खपवले जाते. Savarkar thoughts on Cow त्यांनी काही ठिकाणी ‘गोवध' समर्थनीय असल्याचीही संपूर्ण संदर्भासह मांडणी केली आहे. अपवादात्मक स्थितीत, एखादे हिंदू सैन्य शत्रूच्या वेढ्याने घेरलेले आहे आणि अशावेळी सैन्याला जिवंत राहण्यासाठी ‘राष्ट्र सर्वोपरी' मानून दुसरा पर्याय नसल्यास गायीचे मांस खाऊन हिंदू राष्ट्राच्या शत्रूशी झुंजत राहणे, हाच खरा धर्म होय, असे ते म्हणतात. हा विचार अधिक स्पष्ट करण्यासाठी ते गोहत्येपेक्षा स्वराष्ट्रहत्या हे सहस्रपटीने मोठे पाप आहे, असेही सावरकर म्हणतात. पण सर्वसाधारण स्थितीत ‘गोपालन हवे' हेच स्वातंत्र्यवीर सावरकर मांडतात आणि तेच खरे आहे.
९८८१७१७८२९