ओटावा,
Nijjar's killer हरदीपसिंग निज्जरची हत्या. खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाच्या पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. कॅनडाच्या पोलिसांनी तीन आरोपींची छायाचित्रे शेअर केली आहेत. याशिवाय निज्जरला मारण्यापूर्वी या आरोपींनी वापरलेल्या कारचा फोटोही पोलिसांनी शेअर केला आहे. भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेने 2020 मध्ये निज्जरला दहशतवादी घोषित केले होते. हरदीप सिंग निज्जर यांची जून २०२३ मध्ये सरे येथील गुरुद्वाराजवळ हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. जस्टिन ट्रुडो सरकारने निज्जर यांच्या हत्येसाठी भारतीय यंत्रणांना जबाबदार धरले होते. मात्र, भारत सरकारने कॅनडाचे दावे निराधार असल्याचे म्हटले होते.
भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेने 2020 मध्ये निज्जरला दहशतवादी घोषित केले होते. हरदीप सिंग निज्जर यांची जून 2023 मध्ये सरे येथील गुरुद्वाराजवळ हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. जस्टिन ट्रुडो सरकारने निज्जर यांच्या हत्येसाठी भारतीय यंत्रणांना जबाबदार धरले होते. Nijjar's killer मात्र, भारत सरकारने कॅनडाचे दावे निराधार असल्याचे म्हटले होते. जुलै 2022 मध्ये, भारतीय दहशतवादविरोधी एजन्सीने जालंधरमधील एका हिंदू पुजाऱ्याच्या हत्येप्रकरणी हरदीप सिंग निज्जरवर 10 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले होते. त्याचवेळी 2007 मध्ये पंजाबमध्ये एका सिनेमागृहात झालेल्या बॉम्बस्फोटाचाही निज्जरवर आरोप होता.
5 मोठे खुलासे
- करणप्रीत सिंग, कमलप्रीत सिंग आणि करण ब्रार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ते पंजाब आणि हरियाणाचे नागरिक असल्याचे सांगण्यात येत आहे.
- हे सर्वजण 2021 मध्ये तात्पुरत्या आणि स्टुडंट व्हिसावर कॅनडामध्ये आले होते, परंतु त्यापैकी कोणीही तेथे अभ्यासासाठी प्रवेश घेतला नव्हता.
- हे सर्व आरोपी लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. तिघांना एडमंटन, अल्बर्टा येथे अटक करण्यात आली.
- कॅनडाच्या एका वृत्तपत्राने कॅनडाच्या पोलिसांचा हवाला देत दावा केला आहे की अटक करण्यात आलेला आरोपी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या संपर्कात होता.
- कॅनडाच्या पोलिसांनी हत्येमागील कारणाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. विशेष म्हणजे पोलिसांनी भारताशी संबंध असल्याचा कोणताही पुरावा दिलेला नाही. तिन्ही संशयित कॅनडामध्ये कायमस्वरूपी रहिवासी परवान्यावर राहत होते.