गोंदिया,
Unseasonal Rain-Meteorological Department : हवामान विभागाने दर्शविलेल्या अंदाजानुसार आज सकाळी शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाचे पुन्हा दाणादाण उडविली. तालुक्यासह अनेक भागात तास दोनतास जोरदार पाऊस बरसला. धानासह फळ, भजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.
खबरदार बालविवाह लावाल तर !
मंगळवारी संध्याकाळी पावसाने झाडपल्यानंतर बुधवारी दिवसभर उन्ह-सावलीचा खेळ सुरू होता. रात्रीपासून वातावरण ढगाळ होते. सकाळी साडेसातच्या सुमारास सर्वत्र अंधार पसरून पावसाला सुरुवात झाली. यामुळे चाकरमाने, कामगार व शेतकर्यांची एकच धांदल उडाली. अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत असल्याने धानासह इतर पिकांना फटका बसला आहे. जिल्ह्यात 53 घरांचे अंशता तर एका गोठ्याचे नुकसान झाले. एका ठिकाणी पशु हाणीची नोंद करण्यात आली. तिरोडा तालुक्यात पावसाची तिव‘ता अधिक होती. येथे सर्वाधिक 26 घरांचे व एका गोठ्याचे नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार 10 लाख 76000 हजार रुपायाच्या नुकसानीची नोंद झाली आहे.
तर पिक नुकसानीचा आकडा मौका पाहणीनंतरच कळू सकेल. अवकाळी पाऊस शेतकर्यांचा पाठलाग सोडायला तयार नसल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. आज बरसलेल्या पावसामुळे शहरातील अनेक नाल्या तुंबल्या होत्या. बाजारात पाणीचपानी होते. शहरातील एकमेव भुयारी मार्गावर दीडदोन फुट पाणी वाहत असल्याने वाहतुक प्रभावित झाली होती. यावेळी शहरासह अनेक ठिाकाणी वीज पुरवठा खंडीत झाला होता. वादळी वार्यासह जोरदार पाऊस पडल्याने टिनपत्रे, झाडे व वीज खांब उलमळून पडले.
हवामानात सतत बदल
रब्बी पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकरी उन्हाळी पिकाच्या आशेवर होता. अनेक भागातील शेतकर्यांचे धान, मका, मूग, भाजीपाला, फळ पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या महिनाभरापासून वातावरणामध्ये मोठा बदल झाला आहे. कधी कडक ऊन तापते तर कधी हुडहुडी भरणारी थंडी असते. त्यामुळे वेगवेगळ्या आजारांनी नागरिक त्रस्त असताना दुसरीकडे पिकांनाही मोठा फटका सहन करावा लागत आहे. वातावरण बदलामुळे पिकांसह आरोग्यावरही प्रभाव जानवत आहे.
सततच्या अवकाळी पावसाने पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. तेच दुःख विसरेनासे झाले असून, मंगळवार व आज पुन्हा झालेल्या पावसाने शेतातील पिकांची मोठी हाणी झाली आहे. ऐन धान कापणीच्या वेळी पावसाच्या दगाफटक्याने तोंडचा घास हिरावल्या जात आहे.
शेतकरी टीकाराम लिल्हारे, महालगाव