महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर....महिलांना मिळणार १५०० रुपये!

    दिनांक :28-Jun-2024
Total Views |
मुंबई,
budget of Maharashtra विधान सभेच्या तोंडावर राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे.  विधानसभा निवडणुकीपूर्वी मांडण्यात आलेल्या महायुतीच्या या अर्थसंकल्पात महिलावर्गाला केंद्रस्थानी ठेवून अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील लोक्रपिय मुख्यमंत्री लाडली बहन योजनेच्या धर्तीवर राज्यात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना सुरु करण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत गरीब कुटुंबातील महिला आणि तरुणींना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांचे वाटप केले जाईल, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
 
SVBSGST
 
  • २०२४-२५ वर्षाचा अतिरिक्त अर्थ संकल्प सादर करतोय, असं म्हणत अजित पवारांनी संत तुकारामांचा अभंग सादर करत बजेट मांडायवा सुरुवात केली. हेही वाचा: धोनीचा नवा लूक इंटरनेटवर व्हायरल!
  • केंद्र सरकार तिसऱ्यांदा स्थापन झाल्यावर ७६ हजार कोटींच्या वाढवण बंदराला मंजुरी मिळाली आहे. केंद्राचे असेच भक्कम पाठबळ राज्याला लागेल अशी अपेक्षा बाळगतो. असं देखील पुढे अजित पवार म्हणाले.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत  वय २१ ते ६० वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहे. त्यासाठी दरवर्षी ४६ हजार कोटींची तरतूद केली जाईल. जुलै २०२४ पासून योजनेची अंमलबजावणी केली जाईल. हेही वाचा : नीट पेपर लेक प्रकरणाचा मुद्दा काढताच...संसदेत फुलो देवी झाल्या बेशुद्ध ?
  • ई रिक्षा योजनेच्या पहिल्या टप्प्यात १० हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी ८० कोटींचा निधी उपलब्ध करणार. सामुदायिक विवाहात १० हजारांवरून २५ हजार रुपयांपर्यंत अनुदानात वाढ करण्याचा निर्णय देखील महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.
  • जुन्या रुग्णवाहिकांऐवजी नव्या रुग्ण वाहिका देणार.
  • हर घर जल, योजनेत नळ जोडणी केली जाणार आहे.
  • स्वयंपाकघरात स्वच्छ इंधनासाठी एलपीजी पुरवठा वाढवण्याची गरज असल्याचं सांगितलं, त्यानुसार प्रयत्न केलं जाणार आहे.
  • प्रत्येक पात्र कुटुंबाला ३ गॅस सिलिंडर मोफत देण्याची योजनेची घोषणा केली.
  • अंगणवाडी सेविका यांना १ लाख रुपयांचा लाभ देण्यात येत आहे.
  • बचत गटांच्या निधीच्या रक्कमेत १५ हजारांहून ४० हजार रुपये करण्यात येत आहे.
  • या वर्षात २५ लाख महिलांना लखपती दीदी करण्याचा उपक्रम राबवला जाणार आहे.
  • ८ लाख रुपयांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या मुलींना शिक्षणात १०० टक्के प्रतिपूर्ती करणार
  •  स्वावलंबी शेतकरी संपन्न शेतकरी
  • या अंतर्गत नमो शेतकरी निधी, एक रुपयांत पीक विमा देतोय
  • नैसर्गिक नुकसानभरपाई म्हणून २२ हजार कोटी रुपयांची मदत केली आहे
  • २४ लाख शेतकऱ्यांना मदत दिली आहे