इस्लामाबाद,
Article 370 : कलम ३७० च्या मुद्यावर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचे समर्थन करताना, या मुद्यावर आमचे विचार सारखेच असल्याचे वक्तव्य पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ‘वाजा आसिफ यांनी केले. कलम ३७० च्या काँग्रेस आघाडीच्या भूमिकेसोबत आम्ही सहमत आहोत, असे ‘वाजा आसिफ यांनी जियो टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
शेख अब्दुल्ला आणि जवाहरलाल नेहरू यांनी ३७० आणि ३५ ए कलम लावले होते. विधानसभा निवडणुकीत विजय झाला, तर ३५ ए आणि ३७० कलम परत आणले जाईल, असे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडी म्हणत आहे. शक्य आहे का, या जियो टीव्हीचे वरिष्ठ पत्रकार हामिद मीर यांनी ‘कॅपिटल टॉक’ नावाच्या कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नाला ‘वाजा आसिफ उत्तर देत होते.
हेही वाचा : VIDEO: रविचंद्रन अश्विनने बॅटने दाखवला करिष्माई अवतार आणि केली धोनीची बरोबरीमाझ्या मते हे शक्य आहे. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स या दोन्ही पक्षांची महत्त्वपूर्ण उपस्थिती आहे. या मुद्यावर काश्मीर खोर्यातील नागरिक प्रेरित झाले आहेत. अशीच स्थिती खोर्याच्या बाहेरही ही आघाडी सत्तेत येण्याची जास्त शक्यता आहे. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्याचा मुद्दा निवडणुकीत उचलला आहे. राज्याचा दर्जा पुन्हा मिळाल्यास काश्मिरी लोकांच्या जखमेवर काही प्रमाणात मलम लावले जाईल, असे ‘वाजा आसिफ यांनी सांगितले होते.
काँग्रेसचे नेते पवन खेडा यांच्या वक्तव्याचा हवाला देताना, आम्ही हा हक्क मिळवून देऊ, असे म्हणत असल्याचे मीर यांनी सांगितले. पाकिस्तान आणि भारतातील काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सचे राजकारण एकाच बाजूचे आहे, असे तुम्हाला वाटत नाही का, असा प्रश्न त्यांनी विचारला. यावर, कलम ३७० वर पाकिस्तान आणि काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सचे विचार सारखेच आहेत. काश्मीरला राज्याचा दर्जा दिला जावा, अशी आमचीही मागणी असल्याचे ‘वाजा आसिफ म्हणाले.