IC814 कंधार हाईजैकमध्ये दहशतवाद्यांच्या हिंदू नावांवरून गोंधळ

    दिनांक :02-Sep-2024
Total Views |
नवी दिल्ली, 
IC 814 Kandahar Hijack कंधार हाईजैकवर आधारित 'IC814' ही वेबसिरीज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. चित्रपटात दहशतवाद्यांची हिंदू नावे वापरण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या आंदोलनानंतर केंद्र सरकारच ॲक्शन मोडमध्ये आले आहे. नेटफ्लिक्सवर येणाऱ्या या वेब सिरीजबाबत सरकारने नेटफ्लिक्सच्या कंटेंट हेडला नोटीस पाठवली आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेटफ्लिक्सच्या कंटेंट हेडला 'IC814' वेब सीरिजबाबत चौकशीसाठी बोलावले आहे. हेही वाचा : पॅरालिम्पिकमध्ये या खेळाडूकडून हिसकावले पदक
 
IC 814 Kandahar Hijack
चित्रपटात दहशतवाद्यांची हिंदू नावे वापरण्यात आली असून त्यामुळे खळबळ उडाली आहे. चित्रपट निर्माते अनुभव सिन्हा यांनी हे सर्व जाणूनबुजून केले आहे, असे भाजपाने म्हटले आहे. भाजपा नेते अमित मालवीय म्हणाले की, हिंदू नावाने दहशतवाद्यांची मुस्लिम ओळख लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. IC 814 Kandahar Hijack आता या चित्रपटावर बहिष्कार टाकला पाहिजे. भाजपा नेते अमित मालवीय म्हणाले की, पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या गुन्ह्यांना न्याय देण्याचा डाव्यांचा हा अजेंडा आहे. हीच सिनेमाची ताकद आहे, जी 70 च्या दशकापासून कम्युनिस्ट आक्रमकपणे वापरत आहेत. यामुळे दीर्घकाळ भारताच्या सुरक्षा यंत्रणेवरच प्रश्न निर्माण होतील.
विमान अपहरण करणारे पाच दहशतवादी सर्व मुस्लिम होते. ज्यांची नावे होती इब्राहिम अख्तर, शाहिद अख्तर, सनी अहमद, जहूर मिस्त्री आणि शाकीर. मात्र, या चित्रपटात या दहशतवाद्यांची नावे बदलून भोला आणि शंकर अशी ठेवण्यात आली आहेत. या मुद्द्यावरून वादाला तोंड फुटले आहे. IC 814 Kandahar Hijack सोशल मीडियावरही या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. डिसेंबर 1999 मध्ये 176 प्रवाशांना घेऊन उड्डाण करणारे इंडियन एअरलाइन्सचे विमान IC-814 काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नवी दिल्लीला जाणार होते. दरम्यान, टेक ऑफ करताना या विमानाचे अपहरण करण्यात आले.