नागपूर,
Bakutai Nagar Nagpur लाव्हा ७ सोसायटी, बकुताई नगर येथील महिला मंडळांनी दुर्गा उत्सवाचे आयोजन मंत्रोच्चाराने घटस्थापना व पूजन करून उत्साहात साजरे केले. सोसायटीच्या अध्यक्षा नलिनी पठाडे यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात झाली.रोज सकाळी व संध्याकाळी देवीची आरती, भजन, विविध मनोरंजन खेळ, अष्टमीला महाकन्याचे पूजन करण्यात आले. रात्री महिला मंडळाने पारंपारिक नववारी पोशाख परिधान करून गरबा नृत्य सादर केले
या कार्यक्रमात नलिनी पठाडे, सोनु उईके, सुषमा कावडे, काजल ठाकरे, मनिषा उईके, सोनाली लाडंगे, शीतल आमदारे, गीता चवरे, मिथिलेश सिंग, किरण गोरखेडे,Bakutai Nagar Nagpur खुशी चव्हाण, रिमी सिंग, जाग्रीती श्रीवास्तव, अरुणा बोबाट, भारती पडोले, करुणा गौतम, प्रीती मडावी, हरिभाऊ उईके यांनी सक्रिय सहभाग घेतला.
सौजन्य:रमेश मेहर संपर्क मित्र