हिंगणघाट,
vijayadashami-festival : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा बुरकोणीचा विजयादशमी उत्सव २८ सप्टेंबर रोजी झाला. याप्रसंगी जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत, प्रमुख अतिथी म्हणून केशव मुंगले, हिंगणघाट तालुका कार्यवाह निशांत आंबटकर तर प्रमुख वते गुरुदत्त चवरे उपस्थित होते.
याप्रसंगी गुरुदत्त चवरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त संघाचा इतिहास, प्रवास व त्यामध्ये आलेले अडथळ्यांविषयी माहिती दिली. आगामी वर्षात समरसता युक्त व्यवहार, संस्कार क्षम कुटुंब, पर्यावरण पूर्वक जीवनशैली, नागरिक कर्तव्य, स्वदेशी जीवनशैलीचे हे पंच परिवर्तन कार्यक्रम घ्यायची असल्याचे आवाहन केले.
प्रास्ताविक निशांत आंबटकर यांनी केले. वैयक्तिक गीत शुभम कटारे यांनी तर अमृत वचन आदर्श जाधव यांनी सादर केले. उत्सवाला गावातील स्वयंसेवक व नागरिक उपस्थित होते. गावातील प्रमुख मार्गाने पथसंचलन काढण्यात आले.