दीक्षाभूमीवर धम्मक्रांतीचा जागर

    दिनांक :01-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Dhammachakra Pravartan Day, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीवर बाैद्ध धम्माची दीक्षा घेतल्याच्या घटनेला यंदा ६९ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त २ ऑक्टाेबरला हाेणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिन साेहळ्यासाठी देशविदेशातून लाखाे बाैद्ध अनुयायी नागपुरात दाखल झाले आहे. त्यांच्या स्वागतासाठी दीक्षाभूमी स्मारक आणि सभाेवतालचा परिसर आकर्षक राेषणाईने फुलला आहे.
 

Dhammachakra Pravartan Day nagpur 
 
 
आजपासून ६९ वर्षांपूर्वी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह धम्माची दीक्षी घेत बाैद्ध धर्मात प्रवेश घेतला. ताे दिवस हाेता विजयादशमी. तारीख हाेती १४ ऑक्टाेबर १९५६. या स्मृतीला उजाळा देण्यासाठी देशभरातील लाखाे अनुयायी दरवर्षी विजयादशमीला दीक्षाभूमीला अभिवादन करण्यासाठी येतात. गेल्या तीन ते चार दिवसांपासून अनुयायांचे जत्त्थे बस, रेल्वे, खासगी वाहने आदींनी दीक्षाभूमीवर येत आहे. त्यांच्या स्वागतासाठी तसेच अनुयायांना इतरही साेयीयुविधा पुरविण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था, महानगरपालिका सज्ज आहे. ठिकठिकाणी मांडव टाकून विविध सुविधा पुरविल्या जात आहेत. महापालिकेर्माफत दीक्षाभूमी चाैकात एलएडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रसारण यार्माफत केले जाणार आहे. बाहेरून आलेल्यांनी दीक्षाभूमीकडे जाताना मार्गाची अडचण येऊ नये यासाठी रस्ता दाखविणारे फलक लावण्यात आले आहे. ठिकठिकाणी अनुयायांच्या भाेजनाची आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
 
 

विविध आराेग्यसेवा
धम्मचक्र प्रवर्तन Dhammachakra Pravartan Day, दिनाचे औचित्य साधून दीक्षाभूमी मार्गावर नागरिकांसाठी नेत्र आणि आराेग्यतपासणी शिबिराचे आयाेजन काही संस्थांद्वारे करण्यात आले आहे. याला प्रचंड प्रतिसाद मिळत असूून बुधवारी विविध ठिकाणाहून आलेल्या नागरिकांसह बाैद्ध भिक्खूंनीही आराेग्य तपासणीचा लाभ घेतला.
 
 
पुस्तकविक्रीला प्रचंड प्रतिसाद
धम्मचक्र प्रवर्तन Dhammachakra Pravartan Day, दिनानिमित्त दरवर्षी दीक्षाभूमीवर प्रचंड प्रमाणात पुस्तकविक्री हाेते. यंदाही शंभरावर पुस्तकविक्रेत्यांचे स्टाॅल येथे लागले आहेत. विशेष म्हणजे अतिशय कमी किमतीत येथे भारतीय संविधान, बाबासाहेबांची भाषणे, चरित्र आदींसह इतरही पुस्तके उपलब्ध हाेत असतात. त्यामुळे या पुस्तकविक्रीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.