नागपूर,
Dharampeth School तारकुंडे धरमपेठ उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय आणि टिप टॉप कॉन्व्हेन्ट, स्वावलंबी नगर येथे ३० सप्टेंबरला ॲड. अविनाश लांजेवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ “लॉ फॉर लाईफ” हा विधी जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.
अंभृणी सेवा संस्था आणि अविरत सृजन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील कायद्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. Dharampeth School बालसुरक्षा, सायबर सुरक्षा आणि वाहतूक नियम यावर सोप्या उदाहरणांद्वारे संवाद साधला गेला.मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि जबाबदार नागरिक होण्याची प्रतिज्ञाही केली.
सौजन्य:स्वप्निल बोहाते,संपर्क मित्र