मिरा रोडमध्ये गरब्यात गोंधळ; फेकली अंडी

    दिनांक :01-Oct-2025
Total Views |
मुंबई,
Garba chaos in Mira Road नवरात्रोत्सवानिमित्त मिरा रोड पूर्वेतील जे.पी. नॉर्थ गार्डनर सिटी या नामांकित सोसायटीत आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक गरबा कार्यक्रमादरम्यान मोठा वाद निर्माण झाला. गरबा सुरू असताना एका व्यक्तीने सोसायटीच्या सोळाव्या मजल्यावरून अंडे फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्याने नागरिक संतप्त झाले. या घटनेमुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला असून काशिमिरा पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास सोसायटीत गरबा रंगात सुरू होता. त्याचवेळी एस्टेला बिल्डिंगमधील एक रहिवासी मोबाईल हातात घेऊन खाली आला. त्याने मोठ्या आवाजात संगीत सुरू असल्याचे डेसिबल लेव्हल तपासले तसेच व्हिडिओ काढून पोलिसांना दाखवण्याचा प्रयत्न केला.
 

Garba chaos in Mira Road 
 
 
यापूर्वीही या व्यक्तीने अनेकदा पोलिसांना फोन करून कार्यक्रम थांबवण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, रात्री साधारण अकराच्या सुमारास एस्टेला बिल्डिंगच्या १६व्या मजल्यावरून काहीतरी खाली फेकण्यात आले. थोड्याच वेळात दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या जवळ अंडे फुटलेल्या अवस्थेत आढळले. त्यामुळे परिसरात प्रचंड संताप उसळला. नागरिकांनी तातडीने संशयित व्यक्तीवर आरोप केले आणि मोठा गोंधळ घालून पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकारानंतर शिवसेना शाखाप्रमुख महेश शिंदे तसेच हिंदूवादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. Garba chaos in Mira Road त्यांनी पोलिसांवर दबाव टाकत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. अखेर पोलिसांनी धार्मिक उपासनेदरम्यान व्यत्यय आणल्याप्रकरणी त्या व्यक्तीविरुद्ध बी.एन.एस. २०२३ कलम ३०० अंतर्गत गुन्हा दाखल केला. तथापि, अद्याप त्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी त्याला सकाळी ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.
  
शिवसेना शाखाप्रमुख महेश शिंदे यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, नवरात्र उत्सवाच्या काळात समाजकंटकाने गरबा सुरू असताना पोलिसांच्या उपस्थितीत अंडी फेकली. हा प्रकार अतिशय निंदनीय असून पोलिसांच्या डोळ्यासमोर घडला आहे. आम्ही पोलिसांना स्पष्ट सांगितले की, Garba chaos in Mira Road आरोपीवर कठोर कारवाई होईपर्यंत शिवसैनिक इथून हलणार नाहीत. अखेर नागरिकांच्या दबावामुळे पहाटे चार वाजता गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, या व्यक्तीने यापूर्वी बकरी ईदच्या काळातही वाद निर्माण केल्याची माहिती रहिवाशांनी दिली आहे. त्यामुळे या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.