गोविंदराव वंजारी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

    दिनांक :01-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Govindrao Vanjari College गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी सॉफ्ट पॉलिनोमियल्स (आय) प्रा. लि., सीडॅक, नागपूर येथे एक दिवसीय औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले.ही भेट प्राचार्य डॉ. सलीम चव्हाण आणि एचओडी, सी.एस.इ., विवेकानंद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
 

viddya 
 
 
या भेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना आय.टी. डोमेनची माहिती देणे आणि आयटी उद्योगांची कार्य रचना जाणून घेणे हा होता.सॉफ्ट पॉलिनोमियल्सचे Govindrao Vanjari College अभ्यासक्रम समन्वयक अनुप पारधी यांनी विद्यार्थ्यांना विविध सॉफ्टवेअर प्रकल्प वास्तविक जीवनात कसे वापरले जातात ते समजावून सांगितले. यावेळी प्रा. मनोज वैराळकर, प्रा. प्रवीण वाट, प्रा. शितल झलके आणि प्रा. अंजली भोयर उपस्थित होते.
सौजन्य: प्रा. मनोज वैराळकर,संपर्क मित्र