जयेश ढाकूलकार विभागस्तरीय मल्लखांब स्पर्धेस पात्र

    दिनांक :01-Oct-2025
Total Views |
कारंजा लाड,
Jayesh Dhakulkar, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशीम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तरीय मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धा २०२५ लोकमान्य व्यायाम शाळा, कारंजा येथे उत्साहात आणि दिमाखात पार पडल्या.
 

Jayesh Dhakulkar,  
जिल्ह्यातील विविध शाळांमधील अनेक गुणवान खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून अप्रतिम खेळ कौशल्य सादर केले. या स्पर्धेत गोविंद महाराज उच्च प्राथमिक मराठी शाळेचा १४ वर्षांखालील विद्यार्थी जयेश सुधाकर ढाकूलकार याने अत्यंत प्रभावी खेळ सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आपल्या उत्कृष्ट संतुलन, ताकद आणि कसबाच्या जोरावर जयेशने जिल्हास्तरावर विजेतेपद पटकावत विभागीय स्तरावर आपले स्थान पक्के केले. त्याच्या या कामगिरीने केवळ शाळेचेच नव्हे तर संपूर्ण कारंजा तालुक्याचे नाव उंचावले आहे. विजयानंतर जयेशने आपल्या यशाचे श्रेय शाळेच्या मुख्याध्यापिका अपर्णा कदम, मार्गदर्शक शिक्षीका रीना कनोजे तसेच शाळेचे अध्यक्ष किरण चौधरी यांना दिले.
याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी किशोर बोंडे, तालुका क्रीडा अधिकारी मंगला शेंडे, जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे पदाधिकारी गोपाल राऊत आणि आनंद पेंटे यांनी जयेशच्या कौशल्याचे कौतुक करत त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पुढील विभागीय स्पर्धेतही तो नक्कीच यशाची परंपरा कायम ठेवेल, असा विश्वास व्यक्त केला. शाळेचे अध्यक्ष किरण चौधरी, संचालक संतोष चौधरी, मुख्याध्यापिका अपर्णा कदम, क्रीडाशिक्षक गजभिये यांच्यासह सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी जयेशचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.